Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळमधील वाद चिघळला : प्रकाश बेलवडे यांच्या विरोधात घोषणा, दूध संस्था प्रतिनिधींचा सहाय्यक निबंधक कार्यालयावर मोर्चासंयुक्त राजारामपुरी शिवजयंती उत्सव मंडळतर्फे शिवजयंती महोत्सववेताळमाळ तालीम मंडळ ठरला सतेज चषकाचा मानकरी ! दिलबहार तालीम मंडळाला उपविजेतेपद !!विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रेंचा कार्यालयीन प्रवेश धुमधडाक्यातकोल्हापुरातही शिवसेनेने दुसरे मंत्रीपद द्यावे - सुजित चव्हाण नवीन आलेल्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेची कार्यपद्धती अवलंबणे गरजेचे, निष्ठेला योग्य न्याय मिळतोजिल्हा परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरीकोल्हापुरात पंधरा एप्रिलपासून तीन दिवसीय बसव व्याख्यानमालाविविध उपक्रमानी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी कंपनी सचिव म्हणून प्रशासनासह खासगी कंपन्यातही करिअरच्या मोठया संधी - पवन चांडक

जाहिरात

 

विविध उपक्रमानी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी

schedule14 Apr 26 person by visibility 49 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी  : भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती दिनानिमित्त बिंदू चौकातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अभिवादन केले.

   आमदार जयंत आसगावकर, महापौर रूपाराणी निकम, आयुक्त डॉ राजेंद्र भारूड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जस्मिन, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपायुक्त परितोष कंकाळ, उपमहापौर अक्षय जरग आदी उपस्थित होते .
     पालकमंत्री आबिटकर म्हणाले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या विचारांमुळे भारतीय समाजाला नवी दिशा मिळाली .त्यांनी लोकशाहीची पायाभरणी अधिक मजबूत केली.समाज परिवर्तनासाठी महापुरुषांनी दिलेल्या विचारांचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करणे सध्या काळाची गरज आहे.
    माजी खासदार प्रा.संजय मंडलिक यांनीही समयोचीत विचार व्यक्त केले. प्रारंभी पोलीस बॅण्ड पथकाने आपले सादरीकरण केले. तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वस्तीगृहातील मुलींनी " जागर संविधानाचा " हे पथनाट्य सादर केले तसेच यावेळी प्रतिकात्मक स्वरूपात काही विद्यार्थांना पालकमंत्र्यांच्या हस्ते  वह्या वाटप करण्यात आल्या.
    याप्रसंगी माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर, राजीव आवळे,वसंतराव मुळीक ,विजय देवणे, कादर मलबारी, राजेश लाटकर, प्रा. शहाजी कांबळे, डी.जी भास्कर, उत्तम कांबळे, सुभाष देसाई  आदी  उपस्थित होते .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes