गोकुळमधील वाद चिघळला : प्रकाश बेलवडे यांच्या विरोधात घोषणा, दूध संस्था प्रतिनिधींचा सहाय्यक निबंधक कार्यालयावर मोर्चा
schedule16 Apr 26 person by visibility 567 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : गर्जन संघटनेचे प्रमुख प्रकाश बेलवडे यांच्या विरोधात दूध संस्था प्रतिनिधींनी सहाय्यक निबंध सहकारी संस्था दुग्ध विभाग कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने, विकास पाटील, दिनकर कोतेकर, विजयसिंह पाटील, संजय चितारी, प्रवीण भोसले, रवी पाटील, रंगराव पाटील, राजेंद्र माने, दत्ता पाटील केनवडेकर, राहुल शिरकोळी, सुरेश बोचाटे यांच्यासह कागल आणि चंदगड तालुक्यातील दूध उत्पादकांचा समावेश होता. प्रकाश बेलवडे यांनी जिल्ह्यातील 1200 हून अधिक दूध संस्थांची नोंदणी नियमानुसार नाही व अनियमितता असल्याचे कारण पुढे करत विरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. त्या संस्था अपात्र ठरवाव्यात म्हणून त्यांनी दुग्ध विभाग व कोर्टाची धाव घेतली होती. दुसरीकडे या साऱ्या संस्था पात्र ठरवाव्यात व त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त व्हावा यासाठी दूध उत्पादकाने गुरुवारी दुग्ध विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. प्रकाश बेलवडे कोण रे, पायतान मारा दोन रे, प्रकाश बेलवडेचे करायचे -काय खाली डोकं वर पाय अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. अदृश्य शक्तीचा निषेध असो असा घोषणाही दिल्या या संस्था गेली अनेक वर्ष गोकुळात दूध पुरवठा करत आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीत मतदान केले आहे. मग आत्ताच्या संस्था अपाञ कशा ठरवल्या जात आहेत असा हल्लाबोली त्यांनी केला. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने आणि सहाय्यक निबंध सुजय कदम यांच्याशी फोनवरून संपर्क साधला दूध उत्पादकांना तुम्ही सुनावणीच्या नोटिसा लागू केल्या आहेत आज सुनावणीसाठी बोरवेल आहे मात्र इथे अधिकारी नाहीत शंभर दीडशे किलोमीटर अंतरावर उत्पादक कोल्हापुरात आले आहेत त्यांनी कोणापुढे बाजू मांडायची? कोणाच्या दबावाखाली तुम्ही काम करत आहात? गोकुळ बंद करून अमूल वाढवण्यासाठी सगळा खटाटोप सुरू आहे का? ज्यांची सुनावणी झाली त्यांच्या संदर्भात काय निर्णय दिला असा प्रश्नांचा भडीमार केला त्यावर कदम यांनी सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे कामानिमित्त बाहेर असल्याचे सांगितले.