Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळसंबंधीच्या पत्रकबाजीवरुन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा सवालवाचनालय हे गावाच्या उद्धाराचे शक्तिपीठ - माजी कुलगुरू माणिकराव साळुंखेखासगी शिक्षक संघटनांच्यावतीने सीईओ डॉ जस्मिन यांचा सत्कारपीआरएसआय कोल्हापूर चॅप्टरचा उद्घाटन सोहळा दिमाखातप्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांचे निधनआयटी असोसिएशनतर्फे शुक्रवारी कृतज्ञता कार्यक्रमगोकुळच्या संचालक मंडळावर युनियनचे दोन सदस्यडीवाय पाटील इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या निकिता-श्रेयसला इंडिया स्किल्स  स्पर्धेमध्ये रौप्यपदकसोनाळीचा दीपक देसाई स्पोर्ट्स ठरला जीपीएलचा मानकरी ! रंगनाथ स्पोर्ट्स उपविजेता!!दिल्लीतील दुग्ध परिषदेत चेतन नरके करणार मार्गदर्शन

जाहिरात

 

वेताळमाळ तालीम मंडळ ठरला सतेज चषकाचा मानकरी ! दिलबहार तालीम मंडळाला उपविजेतेपद !!

schedule15 Apr 26 person by visibility 224 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन, कोल्हापूर : फुटबॉल शौकिनांनी तुडुंब भरलेले मैदान, दोन तुल्यबळ संघात शेवटच्या मिनिटापर्यंत रंगलेला सामना, पूर्ण वेळेत एक-एक गोल बरोबरीत सुटलेला सामना आणि टायब्रेकरवरील निकालामुळे वाढलेली उत्कंटा अशा वातावरणात वेताळमाळ तालीम मंडळ फुटबॉल संघाने दिलबहार तालीम मंडळावर मात करत सतेज चषक जिंकला. टायब्रेकरमध्ये वेताळमाळ तालीम मंडळ संघाने दिलबहार तालीम संघाचा तीन विरुद्ध एक गोलफरकाने विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. दिलबहार तालीम मंडळाला उपविजेतेपद मिळाले. अंतिम सामन्यात वेताळमाळ तालीम मंडळाच्या गोलरक्षकाने दिलबहार तालीम मंडळाच्या दोन फटके अडवित विजयात मोलाचा वाटा उचलला.
 
डॉ. डी.वाय.पाटील ग्रुप व पाटाकडील तालीम मंडळातर्फे आयोजित सतेज चषक फुटबॉल स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा जल्लोषात झाला. आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, महापौर रुपाराणी निकम, मधुरिमाराजे छत्रपती, माजी आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ झाला. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजीत  बोंद्रे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजयराव देवणे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले, डॉ. भरत कोटकर यांच्यासह नगरसेवकांची प्रमुख उपस्थिती होती. वेताळमाळ तालीम मंडळाचा पार्थ मोहितेला मालिकावीर म्हणून बुलेट गाडी बक्षिस देऊन गौरवण्यात आले.

दिलबहार तालीम मंडळ व वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यातील सामना उत्कंठावर्धक झाला. सामन्याच्या ७८ व्या मिनिटाला दिलबहार तालीम मंडळाला गोल नोंदविण्यात यश आले. वेताळमाळ तालीम मंडळाच्या खेळाडूने हाताने चेंडू हाताळल्यामुळे दिलबहार तालीम मंडळाला पेनल्टी मिळाली. या संधीचा पुरेपूर फायदा दिलबहार तालीम मंडळाने उचलला. दिलबहारचा खेळाडू फेब्ज गिब्जने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र ही आघाडी सामन्याच्या शेवटपर्यंत टिकवण्यात दिलबहारचा संघ कमी पडला. लहान डीमध्ये दिलबहार तालीम मंडळाच्या खेळाडूंमध्ये समन्वयाचा अभाव आणि धुसमुसळेपणचा फायदा वेताळमाळ तालीम मंडळाने उचलला. वेताळमाळ तालीम मंडळाचा खेळाडू आकाश माळीने या संधीचा फायदा उठवित चेंडूला गोलजाळयात धाडले आणि सामना बरोबरीत सोडविला.

सामन्याचा निकाल टायब्रेकरवर झाला. दिलबहार तालीमकडून फेब्ज गिब्जने गोल केला.  प्रथम भोसले, सतेज मोहिते यांचा फटके अडविले गेले. तर माणिक पाटील यांनी मारलेला फटका दिशाहीन ठरला. वेताळमाळ तालीमकडून पार्थ मोहिते, जय कामत व प्रणव कणसे यांनी गोल करत संघाला विजयापर्यंत पोहोचविले. बक्षीस समारंभावेळी नगरसेवक राहुल माने, प्रवीण केसरकर, दुर्वास कदम, अमर समर्थ, संजय मोहीते, प्रतापसिंह जाधव, अर्जुन माने, सुभाष बुचडे, माजी नगरसेवक तोफिक मुलानी, रमेश पुरेकर, सुजय पोतदार, दिग्विजय मगदूम, सुयोग मगदूम,पाटाडकील तालीम मंडळाचे संदीप सरनाईक, राजेंद्र ठोंबरे, शरद माळी, धोंडीराम कांबळे, अभिलाश पाटील, संपत जाधव, दिगंबर सरनाईक, अनिकेत घोटणे, कमलेश शिंदे, यश सरनाईक, पवन सरनाईक, युवराज गवळी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes