Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विविध उपक्रमानी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी कंपनी सचिव म्हणून प्रशासनासह खासगी कंपन्यातही करिअरच्या मोठया संधी - पवन चांडककेआयटीच्या आदित्य साळुंखेस २७ लाख ५० हजाराचे पॅकेज ! बेट्टी ब्लॉक्स आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड !!  काँग्रेसमध्ये घराणेशाहीला ब्रेक ! पदाधिकारी बदलात नव्या चेहऱ्यांना संधी !!बाजार समितीच्या तीन संचालकांना भाडेकरार भोवणार ? जिल्हा उपनिबंधकानी मागवली माहिती महावीर कॉलेजच्या नूतन बोधचिन्हाचे उदघाटनअध्यक्ष महायुतीचा, सत्ता महायुतीची म्हणता मग गोकुळमध्ये हसन मुश्रीफ इतके हतबल कसे काय ? सतेज पाटीलदोन वर्षात कन्व्हेन्शन सेंटरचे काम पूर्णत्वास येईल, कोल्हापूरच्या विकासात हे सेंटर मैलाचा दगड ठरेल : आमदार राजेश क्षीरसागर प्रा. विनय पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सतरा एप्रिलला सत्कार सोहळा, गौरव ग्रंथाचे प्रकाशनवाढीव सभासद संस्थेवरुन गोकुळमध्ये महायुतीमध्ये झुंपली ! मंत्री मुश्रीफ - आमदार शिवाजी पाटील आमनेसामने

जाहिरात

 

कंपनी सचिव म्हणून प्रशासनासह खासगी कंपन्यातही करिअरच्या मोठया संधी - पवन चांडक

schedule14 Apr 26 person by visibility 31 categoryउद्योग

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कंपनी सचिव हा कंपनीचा एक महत्त्वाचा अधिकारी असतो. तो कंपनीच्या कायदेशीर आणि प्रशासकीय कामांसाठी जबाबदार असतो. कंपनी सचिव म्हणून प्रशासनासह खासगी कंपन्यातही करिअरच्या मोठया संधी आहेत. कार्पोरेट क्षेत्रात मोठा वाव आहे. देशात सध्या दीड लाख कंपनी सेक्रेटरीची आवश्यकता आहे.’अशी माहिती दि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेकेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सीएस पवन चांडक यांनी दिली.

चांडक यांनी  आयसीएसआय, कोल्हापूर कार्यालयास भेट दिली. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी सीएस म्हणजे कंपनी सेक्रेटरी हा प्राधान्यक्रमाचा पेशा कसा होईल, यावर प्रकाशझोत टाकला.आयसीएसआयच्या देशभरात मिळून ७७ चॅप्टर आहेत. कोल्हापूर चॅप्टरचा शुभारंभ हा २००५ मध्ये झाला.कोल्हापूर चॅप्टरने २० वर्षाची कारकिर्द पूर्ण केली आहे. या चॅप्टरमध्ये १७४ सदस्य आहेत, ज्यामध्ये कार्पोरेट आणि प्रशिक्षणार्थी कंपनी सेक्रेटरी (सचिव) यांचा समावेश आहे. हे सर्वजण विविध नावाजलेल्या कंपन्यांशी संबंधित आहेत. सीएस सभासदांना  जागतिक ओळख कशी मिळेल यासंदर्भातही त्यांनी ऊहापोह केला. आयसीएसआय ही  सरकारमान्य संस्था आहे. खाजगी कंपन्या आणि सरकारी कंपन्यामध्ये सीएसला संधी आहेत.सीएस करणाऱ्या विद्यार्थ्याना कमी खर्चात वरिष्ठ पदावर काम करण्याची संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कंपनी सेक्रेटरी होण्यासाठी तीन टप्पे पार करावे लागतात. बारावीनंतर कोणताही शाखेचा विद्यार्थी हा कंपनी सेक्रेटरी चा कोर्स करू शकतो तसेच पदवीनंतर देखील तुम्ही हा कोर्स करू शकता.

 कोल्हापूर जिल्ह्यातील सीएस पेशाची प्रगती व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर चॅप्टरच्या कार्यक्षेत्रात  पश्चिम महाराष्ट्राचा समावेश आहे. तसेच सीएस पेशाचा प्रचार पश्चिम महाराष्ट्रात जास्तीत जास्त व्हावा आणि पश्चिम महाराष्ट्रीतील सीएस सदस्यांना व विद्यार्थ्यांना भेटता यावे यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. असे कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष स्वप्नील पाटोळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पत्रकार परिषदेस सीएस जयदीप पाटील, सीएस ज्योतिबा गावडे, सीएस पद्मसिंह पाटील, सीएस सचिन बिडकर, सीएस प्रवीण निंगनुरे, अमित कुमार पाटील, शाहिद महाबरी, कपिला टिक्के आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes