Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
प्रसारमाध्यमात करिअरच्या संधी, संभाषण - लेखन कौशल्यासह कायम अपडेट आवश्यककोल्हापुरात गुरुवारपासून दररोज पाणी पुरवठासैनिक टाकळी येथे एमआयडीसीची कार्यवाही ताबडतोब सुरु करावी, चेंबर ऑफ कॉमर्सची मागणीअंबाबाई मंदिर जतन -संवर्धन कामांच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी समिती, पाच सदस्यीय समितीमी भाग्यवान, शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे पालकत्व लाभले ! दिल्लीपर्यंत झेप घेतली !!मीना शेंडकर बदली आदेशाच्या प्रतिक्षेत, अशोक घुगेंच्याकडे प्राथमिक शिक्षणाधिकारीपदाचा स्वतंत्र कार्यभारकोल्हापूर फर्स्टच्या व्यासपीठावर सन्मान कर्तबगारांच्या कर्तृत्वाचा ! मुलाखतीतून उलगडली यशाची कहाणी ! !पी आर पाटील  म्हणजे  जिव्हाळा जपणारा माणूस : भरत रसाळेसर्किट बेंचकडून अवसायनातील दूध संस्था पात्र, मतदानाचा मार्ग मोकळाउपमहापौर अक्षय जरग यांचा कार्यालयीन प्रवेश

जाहिरात

 

कोल्हापुरात गुरुवारपासून दररोज पाणी पुरवठा

schedule12 Aug 26 person by visibility 36 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : काळम्मावाडी धरण ९५ टक्के भरले असून, कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत थेट पाईपलाईन योजनेतून पाणी उपसा नियमित सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे शहरात सध्या सुरू असलेला एक दिवस आड पाणी पुरवठा बंद करून गुरुवारपासून  ( १३ ऑगस्ट २०२६)  शहरासह संलग्न उपनगरे व ग्रामीण भागातील नळ कनेक्शनधारकांना दररोज नियमित पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. सध्या पावसामुळे नदीपात्रातील पाण्याची गढूळता वाढली आहे. नदीपात्रातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर जलशुद्धीकरण केंद्रामध्ये आवश्यकतेनुसार क्लोरिन व अॅलमचे योग्य प्रमाणात डोस देऊन पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया करण्यात येत आहे. नागरिकांना सुरक्षित व शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत आवश्यक ती दक्षता घेतली जात आहे. तरी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून व गाळून वापरावे. तसेच दररोज नियमित पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतरही उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पाण्याचा अपव्यय टाळावा आणि महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes