Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मीना शेंडकर बदली आदेशाच्या प्रतिक्षेत, अशोक घुगेंच्याकडे प्राथमिक शिक्षणाधिकारीपदाचा स्वतंत्र कार्यभारकोल्हापूर फर्स्टच्या व्यासपीठावर सन्मान कर्तबगारांच्या कर्तृत्वाचा ! मुलाखतीतून उलगडली यशाची कहाणी ! !पी आर पाटील  म्हणजे  जिव्हाळा जपणारा माणूस : भरत रसाळेसर्किट बेंचकडून अवसायनातील दूध संस्था पात्र, मतदानाचा मार्ग मोकळाउपमहापौर अक्षय जरग यांचा कार्यालयीन प्रवेशदूरशिक्षण-ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशास दहा सप्टेंबरपर्यंत मुदतवाढस्वाभिमानीच्या कार्यकारिणीची पुण्यात बैठक, ठरली आंदोलनासह निवडणुकीची रणनिती  पंधरा ऑगस्टला प्रत्येक शाळेत असाक्षरमुक्त गाव शपथ अभियानलिंगायत समाजाच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक, मुंबईतील बैठकीत मुख्यमंत्र्यांची ग्वाही कोल्हापुरात आरसीसी क्लासेसची तोडफोड, शिवराज मोटेगावकरच्या विरोधात एनएसयुआय आक्रमक

जाहिरात

 

मीना शेंडकर बदली आदेशाच्या प्रतिक्षेत, अशोक घुगेंच्याकडे प्राथमिक शिक्षणाधिकारीपदाचा स्वतंत्र कार्यभार

schedule12 Aug 26 person by visibility 125 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने तेरा परिविक्षाधीन शिक्षणाधिकाऱ्यांच्याकडे ठिकठिकाणचा स्वतंत्र कार्यभार दिला आहे.तीस आठवडयासाठी हा प्रशिक्षण कालावधी आहे. यामध्ये परभणी येथील अशोक उद्धवराव घुगे यांच्याकडे कोल्हापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकारीपदाचा स्वतंत्र कार्यभार सोपविला आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारीपदाचा स्वतंत्र कार्यभार घुगे यांच्याकडे सोपविल्यामुळे शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्या नव्या पदस्थापनेकडे लक्ष लागले आहे. शेंडकर यांच्या बदलीचा किंवा पदस्थापनेचा अजून आदेश निघाला नाही. त्या बदली आदेशाच्या प्रतिक्षेत आहेत.

दरम्यान शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशात तेरा अधिकाऱ्यांच्याकडे तीस आठवडयासाठी विविध ठिकाणी पदभार सोपविला आहे. यामध्ये बीड येथील विशाल पांडूरंग मुळे यांच्याकडे सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी, धुळे येथील अमित प्रकाश भदाणे यांच्याकडे नागपूर महापालिकेतील शिक्षणाधिकारी, कोल्हापुरातील ओंकार चंद्रकांत बजागे यांच्याकडे  ठाणे महानगरपालिकेत शिक्षणाधिकारी,  परभणी येथील विकास कोंडिबा कुकडे यांच्याकडे लातूर जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षणाधिकारी, सांगलीतील सुबोध रविंद्र माने यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकारी, अहिल्यानगर येथील  वैभव खंडू बावकर यांच्याकडे धुळे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी, पुणे येथील श्रद्धा सावळाराम झिंजुरके यांच्याकडे परभणी जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकारी, सांगलीतील मनिषा न्यानू कदम यांच्याकडे  रत्नागिरी जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकारी, छत्रपती संभाजीनगर येथील  प्रेरक प्रकाश उजागरे यांच्याकडे गडचिरोली जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणधिकारी, छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती प्रभाकर आरसूड यांच्याकडे नंदूरबार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी, नांदेड येथील मंजुश्री माधव कल्लेवाड यांच्याकडे हिंगोली जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारीपदाचा स्तवंत्र कार्यभार दिला आहे.उपसचिव मो.बा. ताशिलदार यांनी हे आदेश काढले आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes