Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मीना शेंडकर बदली आदेशाच्या प्रतिक्षेत, अशोक घुगेंच्याकडे प्राथमिक शिक्षणाधिकारीपदाचा स्वतंत्र कार्यभारकोल्हापूर फर्स्टच्या व्यासपीठावर सन्मान कर्तबगारांच्या कर्तृत्वाचा ! मुलाखतीतून उलगडली यशाची कहाणी ! !पी आर पाटील  म्हणजे  जिव्हाळा जपणारा माणूस : भरत रसाळेसर्किट बेंचकडून अवसायनातील दूध संस्था पात्र, मतदानाचा मार्ग मोकळाउपमहापौर अक्षय जरग यांचा कार्यालयीन प्रवेशदूरशिक्षण-ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशास दहा सप्टेंबरपर्यंत मुदतवाढस्वाभिमानीच्या कार्यकारिणीची पुण्यात बैठक, ठरली आंदोलनासह निवडणुकीची रणनिती  पंधरा ऑगस्टला प्रत्येक शाळेत असाक्षरमुक्त गाव शपथ अभियानलिंगायत समाजाच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक, मुंबईतील बैठकीत मुख्यमंत्र्यांची ग्वाही कोल्हापुरात आरसीसी क्लासेसची तोडफोड, शिवराज मोटेगावकरच्या विरोधात एनएसयुआय आक्रमक

जाहिरात

 

पी आर पाटील  म्हणजे  जिव्हाळा जपणारा माणूस : भरत रसाळे

schedule12 Aug 26 person by visibility 42 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कागल येथील तु .बा. नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक पी . आर . पाटील  यांनी संपूर्ण सेवा काळात विद्यार्थी व   शिक्षण हिताला प्राध्यान्य देऊन आपली सेवा बजावली . विद्यार्थी व संपूर्ण शिक्षण क्षेत्रांशी जिव्हाळ्याचे नाते जपणारा माणूस म्हणून ते सदैव आठवणीत राहतील असे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीची राज्याध्यक्ष शिक्षक नेते भरत रसाळे यांनी केले. ते  सरस्वती मंगल कार्यालयात आयोजित मुख्याध्यापक पी आर .पाटील यांच्या सेवानिवृत्ती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव वैशाली नाईक या होत्या. पतसंस्थेचे संस्थापक लक्ष्मण पाटील ,संघटनेचे विभागीय अध्यक्ष महादेव डावरे , पतसंस्थेचे माजी चेअरमन प्रवीण पाटील हे उपस्थित होते .
यावेळी बोलताना भरत रसाळे म्हणाले पी .आर. पाटील यांनी आपल्या 29 वर्षांच्या सेवेत आदर्श शिक्षका बरोबरच आमच्या संघटनेचे तालुकाध्यक्ष ,इचलकरंजी येथील खाजगी शिक्षक पतसंस्था व कुर्ली येथील बसवेश्वर पतसंस्थेचे चेअरमन म्हणून चांगले कार्य केले आहे. यावेळी माजी सरपंच कुमार माळी , लालासो झेंडे, यांनी मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक खाजगी शिक्षक समितीचे राज्यसंघटक पी . डी आवळे यांनी केले . प्रदीप कतगर यांनी सूत्रसंचालन केले. अनिल पाटील यानी  आभार मानले .  राजेश रघुनाथदादा कदम, उतमदादा रावसाब पाटील व पंकजा  पाटील यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या
........

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes