प्रसारमाध्यमात करिअरच्या संधी, संभाषण - लेखन कौशल्यासह कायम अपडेट आवश्यक
schedule12 Aug 26 person by visibility 23 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘प्रिंट मीडिया, इलेट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया या क्षेत्रात करियरच्या अनेक संधी आहेत.त्यासाठी भाषेवर प्रभुत्व असणे महत्वाचे आहे.लेखन कौशल्य महत्वाचे आहे.त्यासाठी कायम अपडेट असणे आवश्यक आहे. प्रिंट मीडियातून अनुवादक म्हणून आजच्या काळात संधी उपलब्ध झाल्या आहेत.’ असे प्रतिपादन आर. जे. मनीष आपटे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय युवा दिननिमित्ताने "प्रसारमाध्यमातून करियर संधी " या विषयावर आयोजित ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. संचालक प्रा. डॉ.पी.एस.पाटणकर या अध्यक्षस्थानी होत्या.यावेळी उपकुलसचिव विनय शिंदे, सहायक कुलसचिव दिलीप मोहाडीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपटे म्हणाले, ‘संवाद कौशल्य,विषयांचे ज्ञान,शारीरिक फिटनेस महत्वाचा आहे. प्रत्येक वयोगटातील प्रत्येक जन प्रसार माध्यमामध्ये काम करू शकतो.तसेच डिजिटल माध्यमातून सध्या विविध करियरच्या संधी उपलब्ध होत आहेत. डॉ. पाटणकर म्हणाल्या, प्रसारमाध्यममध्ये करिअर करण्यासाठी भाषाकौशल्य, लेखन कौशल्य, तंत्रज्ञान कौशल्य, आत्मविश्वास, सतत शिकण्याची वृत्ती आत्मसात करणे आवश्यक आहे.त्याच बरोबर प्रसार माध्यमातून रिपोर्टर,कन्टेट रायटर, कन्टेट एडिटरच्या संधी उपलब्ध आहेत.’ सहायक प्राध्यापक डॉ.संजय चोपडे यांनी प्रास्ताविक केले. कोर्स कॉर्डीनेटर डॉ.नगीना माळी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सहायक प्राध्यापक डॉ.नितीन रणदिवे यांनी सूत्रसंचालन केले. समन्वयक नवनाथ चव्हाण यांनी आभार मानले.