Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
निसर्गाची हानी न करता केलेला विकास हा खऱ्या अर्थाने शाश्वत विकास – कुलसचिव व्ही. एन. शिंदेकेआयटीमध्ये राष्ट्रीय स्तरावरील पायोनियर स्पर्धा, सहा हजार स्पर्धकांचा सहभागगुरुवारपासून रमजान रोजे, हिलाल कमिटीची बैठकडॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव स्वीकृत नगरसेवकवरुन राजकारण गाजण्याची चिन्हे, उट्टे काढण्याच्या पावित्र्यात कदम !महापौर दररोज सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत महापालिकेत ; शहर स्वच्छतेसाठी विशेष मोहीमचित्रकार बबन मानेंच्या चित्रकृतींचे मुंबईत प्रदर्शन भाजपकडून स्वीकृत नगरसेवकसाठी प्रा. जयंत पाटील, विजय जाधव, सुनील वाडकरांचे अर्जकोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे पुरस्कार जाहीर, शुक्रवारी वितरण समारंभमहावीर महाविद्यालयात 21 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय कौशल्य शिक्षण परिषद

जाहिरात

 

डीवाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटला सुवर्णपदक

schedule17 Feb 26 person by visibility 45 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीतर्फे आयोजितमहाराष्ट्र स्टेट स्किल्स कॉम्पिटिशन २०२६या राज्यस्तरीय स्पर्धेत डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी दिमाखदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.

महाविद्यालयाच्या संगणक शास्त्र अभियांत्रिकी विभागातील श्रेयस माने आणि निकिता कोळेकर यांनीलँडस्केप गार्डनिंगया कौशल्य प्रकारात उत्कृष्ट सादरीकरण करत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. या यशाबद्दल त्यांना २५,००० रुपये रोख पारितोषिक, सुवर्णपदक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

युवकांमधील तांत्रिक व्यावसायिक कौशल्यांना चालना देऊन त्यांना जागतिक स्तरावर सक्षम करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. संगणक अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांनीलँडस्केप गार्डनिंगसारख्या वेगळ्या आव्हानात्मक कौशल्य प्रकारात सुवर्णपदक मिळवणे ही विशेष उल्लेखनीय बाब मानली जात आहे. त्यांच्या या यशामुळे प्रादेशिक फेरी तसेच विशेष बूटकॅम्प प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाली आहे.

या यशाबद्दल डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, रजिस्ट्रार डॉ. व्ही. व्ही. भोसले आणि डॉ. अजित पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. . के. गुप्ता, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील, विभागप्रमुख डॉ. जी. व्ही. ओतारी, प्रा. सतीश रणभिसे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes