Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात रंगणार ‘मराठी चित्रपटगीत महोत्सव, रसिकांसाठी प्रवेश विनामूल्यइंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनतर्फे गुरुवारी राज्यस्तरीय शिक्षक सन्मान सोहळापशुधनासाठी विमा योजना, पशुपालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याच्या प्रक्रियेला प्रारंभप्राधिकरणच्या सीईओंच्या कामकाजाची चौकशी करा,  आमदार राजेश क्षीरसागर यांचे मुख्य सचिवांना पत्रमहायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ 24 सप्टेंबरला ! आठ ऑक्टोबरला पॅनेलची घोषणा, अदृश्य शक्ती लुप्त झाली !!गोकुळच्या संचालक पदासाठी आमदारही मैदानात, अशोक माने यांचा अर्ज दाखलगोकुळसाठी भाजपचे शक्ती प्रदर्शन, २५ जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल ! इच्छुक वाढल्याने यादी लांबली !!रविकिरण इंगवलेंना तत्काळ अटक करा; शिवसेना पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत मागणीकेआयटी कॉलेजमध्ये प्रथम वर्ष ‘इंडक्शन प्रोग्राम २०२६-२७’ उत्साहातगोकुळच्या 25 जागेसाठी भाजप उमेदवारी अर्ज दाखल करणार ! निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार !!

जाहिरात

 

बांधकाम व्यावसायिकाला एक कोटीच्या खंडणीसाठी धमकावले, साईटवरील बांधकाम बंद पाडले !  पाच खंडणीखोराविरोधात गुन्हा !!

schedule01 Jul 26 person by visibility 719 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर येथील एका बांधकाम व्यावसायीकाकडे तब्बल एक कोटी रुपयाची खंडणी मागितल्याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम व्यावसायिक निलेश सुरेश जाधव यांनी यासंबंधी फिर्याद दिली. आरोपी म्हणून रुईकर कॉलनी येथील अजित भगवान तिवडे, साळोखेनगर चव्हाण कॉलनीतील फैयाज इसाक नगरजी, उचगाव येथील लखन बाळासाहेब माने, मणेरमाळ येथील संजय महावीर किरणगे व लालाशेठ यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
 यातील फिर्यादी निलेश जाधव यांचे मोरेमाने नगर येथे सोनी हाइट्स या नावाने प्रकल्प सुरू आहे. त्यांच्याकडे या पाच आरोपीनी 29 एप्रिल 2026 , सहा व आठ जून 2026 रोजी बांधकाम व्यवसाय करण्यासाठी एक कोटी रुपयांची मागणी केली. सोने हाइट्स या प्रकल्पाच्या ठिकाणी व  रुईकर कॉलनीतील तिवडे यांच्या कार्यालयात बांधकाम व्यावसायिकला बोलावून दमदादी केली.  तसेच तिवडे यांच्या कार्यालयात कोंडून ठेवले. शिवाय बांधकाम व्यवसायिकांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या मोठ्या भावालाही धमकावले असे फिर्यादीत म्हटले आहे. आठ जून रोजी पुन्हा एकदा आरोपीनी बांधकाम व्यवसायिकाला धमकावले.  ' आमचा विषय मिटवल्याशिवाय काम चालू करायचे नाही' असे दमदाटी करत साईटवरील बांधकाम बंद पाडले  अशी फिर्याद बांधकाम व्यावसायिक जाधव यांनी दिली आहे. बुधवारी एक जुलै रोजी फिर्याद दाखल करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes