खासबाग मैदानाची स्वच्छता, दसऱ्यानंतर खासदार - आमदारांच्या निवासस्थानासमोर निदर्शने
schedule12 Oct 26 person by visibility 41 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: घटस्थापनेच्या मुहूर्तावर पहाटेच्या सुमारास कोल्हापूर जिल्हा नागरी समिती /राष्ट्रीय तालीम संघाच्यावतीने गंगावेश तालीम व मोतीबाग तालमीच्या सुमारे अडीचशे मल्लांनी खासबाग कुस्ती आखाड्यातील गवत काढले. रिकाम्या बाटल्या, कागद मिळून सात ते आठ पोथी कचरा काढला. खासबाग मैदान स्वच्छतेचा प्रारंभ केला. या स्वच्छता मोहिमेत अशोक पोवार ,रमेश मोरे ,वस्ताद विश्वास हारुगले ,महाराष्ट्र केसरी वस्ताद विष्णू जोशीलकर कुस्ती कोच चंद्रकांत चव्हाण ,महेश वरुटे ,कालीचरण सोलंकर कुमार पाटील सदबा भिंगुर्डे बापू मेंढे हरिश्चंद्र पुजारी सुरज हवलदार आदी उपस्थित होते
खासबाग मैदान दुरुस्ती व सुशोभिकरणाच्या नावाखाली उपलब्ध निधीचा अधिकाऱ्यांकडून लूटमार चालू आहे. लोकप्रतिनिधींना जागे करण्यासाठी येत्या आठ दिवसात खासबाग मैदानात जबाबदार अधिकाऱ्यांसह जागेवर पंचनामा आंदोलन करू. दसऱ्यानंतर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज ,आमदार राजेश क्षीरसागर यांच्या घरावर निदर्शने करण्यात येतील असे अशोक पोवार व रमेश मोरे यांनी जाहीर केले.