कार डीलर्स असोसिएशनचा आरटीओ कार्यालयावर मोर्चा
schedule13 Aug 26 person by visibility 46 categoryउद्योगमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ओटीपी सक्ती रद्द करा.... आमच्या मागण्या मान्य करा....अशा घोषणा देत कोल्हापूर जिल्हा कार डीलर्स असोसिएशनने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी कार डीलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा झाली.आणि सर्व वस्तुस्थिती समजावून घेत प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी निवेदन स्वीकारले. यातून तात्काळ योग्य तो मार्ग काढण्याची ग्वाही दिली. दरम्यान या आंदोलनात मोठ्या संख्येने असोसिएशनचे सभासद सहभागी झाले होते. काळे टी शर्ट परिधान करून मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चाची समाप्ती झाली. गेली १ ते २ महिने कोल्हापूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन पोर्टल पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाहन खरेदी-विक्री, नाव हस्तांतरण आणि नवीन नोंदणी ही सर्व कामे ठप्प झाली आहेत. यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत असून सर्वसामान्य नागरिक व कार डीलर्सचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप कोल्हापूर जिल्हा कार डीलर्स असोसिएशनचे इजाज नागरकट्टी यांनी केला. विक्रम मोतीपुरे, जमीर सय्यद ,अभिजीत चित्रकार, सुधाकर सासने,प्रशांत पाटील, किरण पाटील, समीर मुल्ला, फैयाज अथणीकर, महेश सकपाळ, शितल दत्तवाडे, समीर तकीलदार यांच्यासह कोल्हापूर जिल्हा कार डीलर्स असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.