भाजपाच्यावतीने कोल्हापुरात तिरंगा पदयात्रा मोठ्या उत्साहात
schedule13 Aug 26 person by visibility 63 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी, कोल्हापूरच्यावतीने ‘हर घर तिरंगा – तिरंगा यात्रा’ अभियानांतर्गत शहरात तिरंगा पदयात्रा आयोजन करण्यात आले. मिरजकर तिकटी येथे भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शहरातील विविध तालीम संस्था, सामाजिक संस्था व संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने एकत्र आले. भारतमातेच्या जयघोषाने आणि राष्ट्रभक्तीच्या उत्साहाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. आमदार अमल महाडिक, महापौर रुपाराणी निकम, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही पदयात्रा निघाली.
पदयात्रेच्या सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मिरजकर तिकटी येथून हातात तिरंगा ध्वज घेऊन पदयात्रेला सुरुवात करण्यात आली.
हातात तिरंगा ध्वज घेतलेले कार्यकर्ते व नागरिक, देशभक्तीपर घोषणा आणि जयघोष यामुळे संपूर्ण मार्गावर राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले. ही तिरंगा यात्रा बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचली.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भारतमाता, छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेतील कलाकार विशेष आकर्षण ठरले.
यावेळी महापालिकेतील सभागृह नेते मुरलीधर जाधव, स्थायी समिती सभापती किरण शिराळे, नगरसेवक प्रा.जयंत पाटील, महिला व बालकल्याण समितीचे उपसभापती दीपा ठाणेकर , नगरसेवक विजयसिंह माने , महिला मोर्चा अध्यक्षा व नगरसेविका माधुरी नकाते, नगरसेविका सृष्टी जाधव, माधुरी व्हटकर, अर्चना कोराणे, पल्लवी देसाई, पूजा राणे, भाजपचे पदसचिव महेश जाधव ,राहुल चिकोडे विश्वजीत पवार, अनिल कामत, महेश यादव, सरचिटणीस विराज चिखलीकर , अमर साठे उपस्थित होते.