आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान समितीत अमल महाडिक
schedule08 Sep 25 person by visibility 34 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाच्या वतीने 25 सप्टेंबर ते 25 डिसेंबर 2025 या कालावधीत आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे.यासाठी भाजप प्रदेशच्या वतीने पाच जणांची समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांच्याकडे सहसंयोजक पदाची जबाबदारी सोपवली आहे. पाच जणांच्या या समितीत संयोजिका म्हणून भाजपच्या प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक त्यांच्याकडे जबाबदारी सोपवले आहे. आमदार स्नेहा दुबे , आमदार विक्रम पाचपुते, आमदार अमल महाडिक व आमदार प्रताप अडसड हे समितीचे सहसंयोजक आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही यादी जाहीर केली आहे.