Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळमध्ये महायुतीची सत्ता म्हणता, अहवालात जिल्ह्यातील एकाही भाजपच्या नेत्यांचा फोटो का नाही ?आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान समितीत अमल महाडिककोल्हापुरात गणेश विसर्जनाची १८ तास जल्लोषी मिरवणूकमहाडिक गटाच्या दूध उत्पादक सभासदांची बैठक, शौमिका महाडिक सोमवारी भूमिका स्पष्ट करणारनोकर भरतीच्या आरोपावरुन सुनील एडकेंचे राजमोहन पाटलांना चॅलेंज, माफी मागण्यासाठी उद्यापर्यंतची दिली मुदत चेअरमनांनी त्यांच्या कोटयातील जागा शिरोळच्या नेत्याला दिली, त्यांचा नातेवाईक बँकेत नोकरीला-राजमोहन पाटीलमाझा मुलगा-भाचा- पुतण्याला बँकेत नोकरीला लावणार नाही- चेअरमन शिवाजीराव रोडे-पाटीलशिक्षक बँकेच्या सभेला गोंधळाचे ग्रहण, एकमेकांच्या उणीदुणीवरुन खडाजंगी ! विरोधकांचा सभात्याग, सत्ताधाऱ्यांची मोठी घोषणा !!गणेश विसर्जन मिरवणुकीत नेत्यांचा हटके अंदाज ! लेझीम नृत्य, साऊंड सिस्टीमवर ताल अन् कार्यकर्त्यांसोबत फेर !!भुयेवाडीत सर्व रोग निदान शिबिर, आयुष्यमान कार्ड वाटप

जाहिरात

 

माझा मुलगा-भाचा- पुतण्याला बँकेत नोकरीला लावणार नाही- चेअरमन शिवाजीराव रोडे-पाटील

schedule07 Sep 25 person by visibility 160 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘शिक्षक बँकेच्या निवडणुकीच्या कालावधीत आम्ही सभासदांना वचन दिले आहे, की बँकेतील कर्मचाऱ्यांची संख्या तीन अंकी करणार नाही. नजीकच्या काळात बँकेत काही जागा भरल्या जातील, पण कर्मचाऱ्यांची संख्या ९९ पुढे जाणार नाही. या भरतीमध्ये माझा मुलगा, भाचा, पुतण्याला बँकेत नोकरीला लावणार नाही. बँकेच्या संस्थापकांची शपथ घेऊन हे सांगतो.’असे खुले आव्हान दि प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन शिवाजीराव रोडे-पाटील यांना विरोधकांना दिले.

प्राथमिक शिक्षक बँकेच्या ८७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (७ सप्टेंबर २०२५) झाली. या सभेत नोकर भरती आणि कर्मचाऱ्यावरील पगाराचा विषय गाजला. चेअरमन पाटील म्हणाले, ‘मागील संचालक मंडळाच्या कारकिर्दीत २०२१ मध्ये बँकेतील कर्मचाऱ्यांच्या पगारावर सात कोटी १३ लाख रुपये खर्ची पडायचे. आमच्या कालावधीत कर्मचाऱ्यांची संख्या २६ ने कमी केली. सध्या पगारावर पाच कोटी ९२ लाख रुपये खर्च होतात. काटकसरीचा कारभार, कर्मचाऱ्यांची संख्या कमी यामुळे  वर्षाला ६१ लाख रुपयांची बचत होत आहे. शिवाय कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीचा करार पाच वर्षाचा केला आहे. बँकेचा व्यवसाय ७१७ कोटी रुपयावर गेला तरी ९३ कर्मचाऱ्यांच्यावर कामकाज सुरू आहे. मी तुलना केली नाही, फक्त प्रगती दर्शक तक्ता दाखविला.’

सरकारी कर्ज रोख्यांची कमी दराने यापूर्वीच्या संचालक मंडळाने विक्री केली. यामुळे वर्षाला पन्नास लाखाहून अधिक रकमेची तूट सहन करावी लागत आहे. पूर्वीच्या संचालक मंडळाच्या कालावधीत दोन वेळेला शून्य टक्के लाभांश होता. सभासदांच्या हाती भोपळा मिळाला. सभासदांच्या हक्काच्या पैशाची उधळपट्टी कोणी केली ? आमच्यावर त्यांच्यासारखे शून्य टक्के लाभांश देण्याची वेळ आली तर, आता व्यासपीठावर जे संचालक दिसतात ते पुन्हा व्यासपीठावर दिसणार नाहीत. पांढरी कपडे परिधान करुन व्यासपीठावर बसण्याचा अधिकार आम्हाला नाही. मात्र आम्ही चांगल्या पद्धतीने कारभार करत बँकेला प्रगतीपथावर नेऊ. आम्ही सत्तेत आल्यापासून गेली तीन वर्षे  सलगपणे लाभांश देत आहोत. आम्ही सभासदांना दोन अंकी लाभांश देण्याची ग्वाही दिली आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रामाणिक कर्जदारांना अर्धा टक्के रिबीट देऊ.’ दरम्यान सभेचे कामकाज उत्कृष्टरित्या चालविले म्हणून सत्तारुढच्या समर्थकांनी, चेअरमन रोडे-पाटील व व्हाइस चेअरमन सुरेश कोळी यांचा सत्कार केला.  

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes