Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
करवीर शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी धनाजी पाटील, उपाध्यक्षपदी दीपाली भोईटेभालकर्स पुरस्कार सोहळ्यात कला वैभव जपण्याचा ध्यास‌ !कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे मंगळवारी कार्यशाळाकाळजी घ्या, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा, कोरोनाला प्रतिबंध करा – कार्तिकेयन एसतंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष विलास पाटील यांचे निधनकेंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या हस्ते डीवाय पाटील हॉस्पिटलचा सन्मानमनसे कोल्हापूर शाखेतर्फे रुग्णालयांना वैद्यकीय उपकरणे प्रदानगोकुळचे लक्ष म्हैस दुधाच्या बाजारपेठेवर, दूध उत्पादन  वाढीसाठी राबविणार विविध योजनापंचशील हॉटेल चौकात युवासेनेचे अनोखे आंदोलन, वाहतूक शाखेला निवेदनजोडधंद्याशिवाय शिक्षक नाही, भ्रष्टाचाराशिवाय अधिकारी नाही-राजन गवस

जाहिरात

 

भालकर्स पुरस्कार सोहळ्यात कला वैभव जपण्याचा ध्यास‌ !

schedule15 Jun 25 person by visibility 54 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गीत-नृत्याचे बहारदार सादरीकरण, माहितीपटातून उलगडलेला चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांचा जीवनप्रवास, कलाकारांनी नाटिकेतून संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे जतन करण्याचे व कलापूरचे सांस्कृतिक ओळख पुढे प्रवाहित ठेवण्यासाठी कार्यरत राहण्याचा केलेला संकल्पआणि विविध क्षेत्रातील कर्तबगारांचा पुरस्कारांनी सन्मानहा थाट होता भालकर्स कला अकादमी पुरस्कार सोहळयाचा.

‘चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर फौंडेशन संचलित भालकर्स कला अकादमीतर्फे  गायन समाज देवल क्लब येथील गोविंदराव टेंबे रंगमंदिर येथे पुरस्कार वितरण सोहळा झाला. महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यानंतर ‘यसबा एक झुंजार वादळ’ या माहितीपटातून  जीवनप्रवास उलगडला. यानंतर पुरस्कार वितरण करण्यात आले. कलामहर्षी बाबुराव पेंटर स्मृती कलासेवा पुरस्कार -जेष्ठ छायाचित्रकार अनिल वेल्हाळ यांना, चित्रतपस्वी भालजी पेंढारकर स्मृती चित्रसेवा पुरस्कार - ज्येष्ठ दिग्दर्शक सतीश रणदिवे यांना, कै.मदन मोहन लोहिया स्मृती नाट्यसेवा पुरस्कार - नाटयकर्मी दिलीप बापट यांना, संगीतकार यशवंत देव स्मृती संगीतसेवा पुरस्कार -  संगीतकार उमेश नेरकर यांना, कै. लक्ष्मण महालिंगा भालकर स्मृती सामाजिक लक्ष्यरत्न प्रेरणा पुरस्कार – डॉ. प्रविण कोडोलीकर यांना तर  मास्टरजी सुबलदा सरकार स्मृती  नृत्यसेवा पुरस्कार - जेष्ठ अभिनेत्री शोभा शिराळकर यांना प्रदान करण्यात आले.

विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अमरसिंह रजपूत, शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी विकास मंडळाचे माजी संचालक पी. टी. गायकवाड, अभिनेते आनंद काळे, अभिनेते देवेंद्र चौगुले, राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते शिक्षक व नृत्यदिग्दर्शक सागर बगाडे, कार्यक्रमाचे संकल्पन व नृत्य दिग्दर्शक संग्राम भालकर फौंडेशनचे अध्यक्ष संदिप भालकर, उपाध्यक्ष सपना जाधव -भालकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरण समारंभ झाला. अश्विनी टेंबे, शिवम गेजगे,स्वरा भालकर यांनी  सूत्रसंचालन केले. पुरस्कार वितरण समारंभानंतर झालेल्य सांगितीक कार्यक्रमात ७५ हून अधिक कलाकारांनी सादरीकरण केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes