करवीर शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी धनाजी पाटील, उपाध्यक्षपदी दीपाली भोईटे
schedule16 Jun 25 person by visibility 60 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी धनाजी दगडू पाटील व उपाध्यक्षपदी दीपाली भोईटे यांची बिनविरोध निवड झाली. शिक्षक नेते कृष्णात कारंडे, शिक्षक बँकेचे अध्यक्ष सुरेश कोळी, संचालिका वर्षा केनवडे, आनंदराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडी झाल्या. निवडणूक निर्णय अधिकारी चौगुले होते. यावेळी संचालक सुकुमार मानकर, सचिन पावसकर, यशवंत चौगले, शशिकांत धुत्रे, धनाजी सासने, बाळासाहेब कांबळे, राजेंद्र तौंदकर, प्रताप पाटील, दीपक पाटील, चंद्रकांत पाटील, संदीप मगदूम, गीता कोळी, संतोष गायकवाड, शब्बीर आवटी, शरद केनवडे, शिक्षक समितीचे गजानन मोरे, बाबा धुमाळ आदी उपस्थित होते.