Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात रंगणार ‘मराठी चित्रपटगीत महोत्सव, रसिकांसाठी प्रवेश विनामूल्यइंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनतर्फे गुरुवारी राज्यस्तरीय शिक्षक सन्मान सोहळापशुधनासाठी विमा योजना, पशुपालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याच्या प्रक्रियेला प्रारंभप्राधिकरणच्या सीईओंच्या कामकाजाची चौकशी करा,  आमदार राजेश क्षीरसागर यांचे मुख्य सचिवांना पत्रमहायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ 24 सप्टेंबरला ! आठ ऑक्टोबरला पॅनेलची घोषणा, अदृश्य शक्ती लुप्त झाली !!गोकुळच्या संचालक पदासाठी आमदारही मैदानात, अशोक माने यांचा अर्ज दाखलगोकुळसाठी भाजपचे शक्ती प्रदर्शन, २५ जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल ! इच्छुक वाढल्याने यादी लांबली !!रविकिरण इंगवलेंना तत्काळ अटक करा; शिवसेना पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत मागणीकेआयटी कॉलेजमध्ये प्रथम वर्ष ‘इंडक्शन प्रोग्राम २०२६-२७’ उत्साहातगोकुळच्या 25 जागेसाठी भाजप उमेदवारी अर्ज दाखल करणार ! निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार !!

जाहिरात

 

प्रशासनाधिकारी डी. सी.कुंभारांना लाच घेताना रंगेहाथ पकडले, पोलिसांची कारवाई

schedule01 Jun 26 person by visibility 3763 categoryगुन्हे

महाराष्ट्र  न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीचे प्रभारी शिक्षणाधिकारी दगडू चंद्राप्पा तथा डी. सी. कुंभार (वय वर्षे ५२ ) यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. शिक्षण समितीच्या कार्यालयाच्या बाहेरच पोलिसांनी कुंभार यांना ताब्यात घेतले आहे. 25 हजार रुपयांच्या लाच प्रकरणी ही कारवाई झाली आहे. कुंभार हे जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षण विभागात विस्तार अधिकारी आहेत. त्यांच्याकडे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या प्रशासनाधिकारीपदाचा प्रभारी कार्यभार आहे. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे त्यांच्याविरोधात तक्रारी दाखल झाल्या होत्या. 

यामधील तक्रारदार हे आंतरजिल्हा बदलीवर महापालिका शाळेत शिक्षक म्हणून काम करत आहेत.त्यांचा थकीत पगार व पगाराचा फरक काढून देण्यासाठी कुंभार यांनी चाळीस हजार रुपयांची मागणी केली. प्रशासनाधिकारी कुंभार यांच्याकडून लाचेची मागणी केल्याची तक्रार संबंधितांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. आंतरजिल्हा बदलीबाबत नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी दहा हजार रुपये यापूर्वी स्वीकारले होते. थकीत पगार व पगाराचा फरक काढून देण्यासाठी कुंभार यांनी तक्रारदारांकडे तडजोडीअंती २५ हजार रुपये घेऊन येण्यास सांगितले. यासंबंधी तक्रारदारांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार सापळा लावण्यात आला. २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना कुंभार यांना सोमवारी ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात  लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलिस हेड काँन्स्टेबल विकास माने, सुधीर पाटील, संगीता गावडे, कृष्णा पाटील, रवींद्र पाटील, प्रशांत दावणे यांच्या पथकाने कारवाई केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes