Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
नऊ जुलैला जिल्ह्यातील शाळा बंद, संस्थाचालक - शिक्षक काढणार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पावसाची संततधार, सात बंधारे पाण्याखाली ! राजाराम बंधाऱ्यावरील वाहतूक बंद !!अकरावी प्रवेश प्रक्रियेची विशेष फेरी ओपन टू ऑलसमग्र शिक्षा संघर्ष समितीच्या मुंबई येथील आंदोलनास यशडीवाय पाटील अभियांत्रिकी केमिकलच्या ५५ विद्यार्थ्यांना प्लेसमेंटमहाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा पदग्रहण सोहळा शनिवारी मुंबईत, केंद्रीयमंत्री, मुख्यमंत्र्यांची उपस्थितीवार्षिक तपासणीवेळी प्रत्येक मुख्याध्यापकाकडे शाळेची यशोगाथा हवी ;  सहविचार सभेत उपशिक्षणाधिकाऱ्यांनी केली १७ विषयांवर चर्चादिवा विझला कायमचा….शिक्षक पात्रता परीक्षा होणार ऑनलाइन ! राज्य परीक्षा परिषदेचे आयबीपीएसला पत्र ! !उद्योगांनी नावीन्य - गुणवत्ता - आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनावे - खासदार धनंजय महाडिक

जाहिरात

 

गोकुळसाठी ५४३९ ठराव दाखल ! करवीर,  राधानगरी -राधानगरी- कागल-भुदरगडमधून जास्त ठराव ! !

schedule01 Jul 26 person by visibility 87 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी ५४३९ ठराव दाखल झाले आहेत. यामध्ये करवीर तालुक्यातून सर्वाधिक ८६७ ठराव दाखल झाले आहेत. राधानगरी तालुक्यातून ७०३ तर कागल तालुक्यातील ठरावांची संख्या ६२१ इतकी आहे. या संदर्भातील माहिती दुग्ध विभागाचे सहायक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी दिली. गोकुळने दुग्ध विभाग, सहायक निबंधक कार्यालयाला संलग्न संस्थांची यादी दिली होती. सहायक निबंधक कार्यालयाकडून दोन जून ते एक जुले २०२६ या कालावधीत ठराव दाखलची प्रक्रिया राबविली होती. आता दोन जुलै ते १५ जुलै या कालावधीत दाखल ठरावांची छाननी प्रक्रिया होणार आहे. छाननी प्रक्रियेत दुबार ठराव, संस्था नोंदणीकृत आहे का याबाबी तपासल्या जाणार आहेत. दरम्यान तालुकानिहाय प्राप्त ठराव पुढीलप्रमाणे आहेत. आजरा तालुक्यातून ३०५ ठराव, भुदरगड तालुक्यातून ५९५ ठराव दाखल आहेत. करवीरमधून ८६७, कागलमधून ६२१, गगनबावडा १३२, गडहिंग्लज ४०१, चंदगड ४२४, पन्हाळा ५१५, राधानगरी ७०३, शाहूवाडी ४४५, शिरोळ २७०, हातकणंगले तालुक्यातून १६१ ठराव दाखल आहेत

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes