शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी रत्नेश शिरोळकर, प्रसाद चव्हाण
schedule17 Feb 26 person by visibility 192 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी रत्नेश शिरोळकर व प्रसाद सुजित चव्हाण यांचे अर्ज दाखल झाले. अतिरिक्त रविकांत अडसुळ यांच्याकडे मंगळवारी अर्ज दाखल करण्यात आले. माजी महापौर सुनील कदम, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख, भारतीय जनता पक्षाचे गटनेते मुरलीधर जाधव, नगरसेवक सत्यजित जाधव, ऋतुराज क्षीरसागर, वैभव माने, स्वरूप कदम, अभिजीत खतकर, अजय इगवले, अनुराधा खेडकर, मंगला साळोखे,अर्चना पागर, आशपाक आजरेकर यावेळी उपस्थित होते.