Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डॉ. मैनाक घोष सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी रुजूशिवाजी स्टेडियमची नव्याने बांधणी ! अंडरग्राऊंड पार्किंग - अंबाबाई मंदिरापर्यंत भुयारी मार्ग !! कोल्हापुरात रविवारी होमेसाकॉन परिषद - डॉ. राजकुमार पाटीलसांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची बदली, डॉ. मैनाक घोष नवे जिल्हाधिकारी32 वर्षाच्या सेवेनंतर प्रा. जयवंत दळवी शनिवारी सेवानिवृत्त होणारलोकप्रतिनिधींच्या पत्रावर दहा दिवसात कार्यवाही, गाव तिथं स्वच्छतागृह ! जिप अध्यक्षांचे सीईओंना पत्रकोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी कमलाकांत कुलकर्णी, उपाध्यक्षपदी श्रीकांत दुधाणेइंधनाचा साठा मुबलक प्रमाणात - आमदार राजेश क्षीरसागरडॉ. संजय डी. पाटील, भरत लाटकर यांना पुरस्कार , शनिवारी विद्यापीठात वितरण समारंभ सरोजिनी फार्मसी कॉलेजमध्ये राष्ट्रीय परिषद, शोधनिबंध - पोस्टर सादरीकरण

जाहिरात

 

डॉ. मैनाक घोष सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी रुजू

schedule28 Mar 26 person by visibility 39 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :   सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. मैनाक घोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी शनिवारी, मावळते जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडून पदभार स्वीकारला. पदहस्तांतरणवेळी  काकडे यांनी  घोष यांचे स्वागत करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासास कटिबद्ध असून, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक अशा सर्वांना सोबत घेऊन विकसित सांगली जिल्हा 2030 व 2047 चे उद्दिष्ट समोर ठेवून वाटचाल करणार असल्याचा मनोदय नूतन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी व्यक्त केला.

महसूल विभागाच्या वतीने नूतन जिल्हाधिकारी घोष यांचे अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांनी स्वागत केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तसेच, दिवसभरात विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनीही  जिल्हाधिकारी डॉ. घोष यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

दरम्यान, मावळते जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची पदोन्नतीने व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कृषि औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई येथे बदली झाली आहे. आपल्या जिल्हाधिकारी पदाच्या कार्यकालात सांगलीने अनेक चांगले अनुभव दिले असून, सांगलीच्या स्मृती सदैव स्मरणात राहतील, अशा भावना काकडे यांनी व्यक्त केल्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes