गांधीनगर व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी अशोक टेहल्यानी
schedule05 Oct 26 person by visibility 22 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर - : गांधीनगर येथील होलसेल व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी अशोक टेहल्याणी, उपाध्यक्षपदी बक्षाराम दर्डां यांची निवड करण्यात आली. असोसिएशनची कार्यकारिणी निवडण्यात आली. यामध्ये असोसिएशनच्या सचिवपदी अमित कट्टार, सहसचिवपदी हिराला गिदवाणी, खजानिसपदी मुरली अडवाणी, लेखापरीक्षकपदी सुरेश टेहल्याणी, सहलेखापरीक्षकपदी हरिदास कुकरेजा यांची निवड झाली. असोसिएशनच्या सल्लागारपदी सेवाराम तलरेजा, गोपाल निरंकारी, प्रकाशलाल विधाणी, बाबमुल आहुजा, महेंद्र जसूजा, रिकी सचदेव, मनोज वंजाणी, विनोद वधवा, मुकेश रोहिडा, सनी चंदवाणी, सुरेश वासवाणी यांची सल्लागारपदी निवड झाली.
शहीद जवान ऋषीकेश जोंधळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
schedule16 Nov 20 person by visibility 915 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : शहीद जवान ऋषीकेश जोंधळे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात बहिरेश्वरवाडी येथे अंत्यसंस्कार झाले. पोलीस आणि लष्कराच्या जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या तीन फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. यानंतर शहीद जवान ऋषीकेश यांचे चुलत बंधू पुंडलिक यांच्या हस्ते अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान पार्थिव सकाळी सात वाजता बहिरेवाडी येथील निवासस्थानी आले. वडील रामचंद्र जोंधळे, आई कविता , बहीण कल्याणी आणि नातेवाईकांनी दर्शन घेतले. यानंतर याठिकाणाहून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. चौका- चौकात फलक लावून आदरांजली वाहिली होती. ग्रामस्थ, विद्यार्थी – विद्यार्थिनी पुष्पहार आणि फूले वाहून आदरांजली वाहत होते. “अमर रहे अमर रहे,ऋषीकेश जोंधळे अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम” अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा श्री भैरवनाथ हायस्कूल येथे पोहचली.
अंत्ययात्रा अंतिम संस्काराच्या ठिकाणी आल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलीक, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.
सुभेदार सखाराम पवार, माजी आमदार संजय घाटगे, समरजितसिंह घाडगे, जि. प. उमेश आपटे, सरपंच अनिल चव्हाण, उपसरपंच उमेश खोत, कर्नल कुलदिप कुमार कर्नल आर. आर. जाधव, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रदिप ढोले, कर्नल शिवाजी बाबर आणि आजी माजी सैनिक संघटच्यावतीनेही पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्यात आली.