Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
णण ददहाज यात्रेकरुंचे कोल्हापूर विमानतळावर स्वागततज्ज्ञ डॉक्टरांचे शनिवारी ओळख मधुमेहाची याविषयी मार्गदर्शनप्रधानमंत्री आवासमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेला तृतीय क्रमांक, शनिवारी पुण्यात पुरस्कार वितरणअभिनेते अरुण सरनाईक यांच्यावर माहितीपट, रविवारी प्रीमियर शोश्री महालक्ष्मी अन्नछत्रचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान, भारत सरकारकडून प्रमाणपत्र प्रदानसलग दुसऱ्यांदा एटी स्पोर्ट्स लिंगायत प्रीमिअर लीगचा मानकरी ! बॅटरी पॉवर सोल्युशन्स उपविजेते !!कुलगुरुनंतर पुढे काय ? या प्रश्नावर डी. टी. शिर्के म्हणाले माझ्यासमोर एक मोठा....जिपमध्ये आता जीपीएफ ऑनलाइन, मोबाइल अॅपद्वारे कळणार प्रॉव्हिडंड फंडाचे स्टेटससंशोधकांनी जिथे समस्या आहेत त्या ठिकाणी संशोधनाला प्राधान्य द्यावे-डॉ. अभय बंग

जाहिरात

 

 लोहिया हायस्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे उत्साही स्वागत

schedule18 Jun 25 person by visibility 37 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित सौ. स. म. लोहिया हायस्कूलमध्ये २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. संपूर्ण शालेय परिसरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. प्रवेशद्वाराच्या सुरूवातीस दुतर्फा फुलांच्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. फुलांच्या माळा, विविध रंगातील फुगे यांचा वापर करून संपूर्ण शालेय प्रवेशद्वार आकर्षक पद्धतीने सजावट केली होती. संस्थेचे सहसचिव व  माजी प्राचार्य  एस. एस. चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रभारी प्राचार्या सविता पाटील यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वागत करत होत्या. प्राचार्या पाटील यांनी,  प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. संस्थेचे सहसचिव चव्हाण यांच्या हस्ते प्रभारी प्राचार्या पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात प्रत्येक विद्यार्थ्यांला पाठ्यपुस्तके तसेच शालेय उपयोगी भेटवस्तू देवून स्वागत केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes