Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठाचे शाहू्प्रेम ! लोकराजावर पाच भाषेत गोष्टीरुपात सचित्र-चरित्र निर्मिती !!हाज यात्रेकरुंचे कोल्हापूर विमानतळावर स्वागततज्ज्ञ डॉक्टरांचे शनिवारी ओळख मधुमेहाची याविषयी मार्गदर्शनप्रधानमंत्री आवासमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेला तृतीय क्रमांक, शनिवारी पुण्यात पुरस्कार वितरणअभिनेते अरुण सरनाईक यांच्यावर माहितीपट, रविवारी प्रीमियर शोश्री महालक्ष्मी अन्नछत्रचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान, भारत सरकारकडून प्रमाणपत्र प्रदानसलग दुसऱ्यांदा एटी स्पोर्ट्स लिंगायत प्रीमिअर लीगचा मानकरी ! बॅटरी पॉवर सोल्युशन्स उपविजेते !!कुलगुरुनंतर पुढे काय ? या प्रश्नावर डी. टी. शिर्के म्हणाले माझ्यासमोर एक मोठा....जिपमध्ये आता जीपीएफ ऑनलाइन, मोबाइल अॅपद्वारे कळणार प्रॉव्हिडंड फंडाचे स्टेटससंशोधकांनी जिथे समस्या आहेत त्या ठिकाणी संशोधनाला प्राधान्य द्यावे-डॉ. अभय बंग

जाहिरात

 

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुरू करा, शिक्षकेतर सेवक संघाचे आंदोलन

schedule18 Jun 25 person by visibility 27 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य सरकारने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू करावी यासाठी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक - उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक शिक्षकेतर संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आंदोलन करण्यात आले. मंगळवारी (१८ जून २०२५) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात भरती थांबविलेल्या संदर्भातील परिपत्रकाची होळी केली.

संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, कार्याध्यक्ष अशोक पाटील, संजय पाटील, उमेश माळी, मारुती मुगुटकर, राजशेखर सुर्वे, सचिन पाटील, मनोहर जाधव आदींचा आंदोलनात सहभाग होता. आंदोलनाला शिक्षक नेते दादासाहेब लाड,  शैक्षणिक व्यासपीठाचे एस. डी. लाड, भरत रसाळे, मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार, सुरेश संकपाळ, श्रीधर गोंधळी, रामदास पाटील, राजेंद्र साळोखे, यांनी पाठिंबा दिला. शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती थांबविली आहे. हे परिपत्रक रद्द करावे. सरकारने त्वरित भरती प्रक्रिया सुरु करावी अशी मागणी करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन दिले.

……………….

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes