शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त शाहू मानेंचा केआयटीत सत्कार
schedule11 May 25 person by visibility 280 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : केआयटी कॉलेजचा विद्यार्थी शाहू माने याला राज्य सरकारने शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले.राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा बालेवाडी क्रीडा संकुल येथे नुकताच पार पडला. दरम्यान केआयटी कॉलेजमध्ये शाहू मानेचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला
केआयटीचे अध्यक्ष साजिद हुदली यांनी शाहू माने व त्यांच्या आई-वडिलांचा महाविद्यालयात सन्मान केला. महाविद्यालय फक्त अभियंतेच नाही तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवत असल्याचे संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी नमूद केले.या माझ्या पुरस्कारामध्ये केआयटीचे योगदानही अत्यंत महत्त्वाचे आहे अशा भावना शाहू माने याने व्यक्त केल्या.या प्रसंगी मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ.उदय भापकर उपस्थित होते.