Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
हाज यात्रेकरुंचे कोल्हापूर विमानतळावर स्वागततज्ज्ञ डॉक्टरांचे शनिवारी ओळख मधुमेहाची याविषयी मार्गदर्शनप्रधानमंत्री आवासमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेला तृतीय क्रमांक, शनिवारी पुण्यात पुरस्कार वितरणअभिनेते अरुण सरनाईक यांच्यावर माहितीपट, रविवारी प्रीमियअर शोश्री महालक्ष्मी अन्नछत्रचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान, भारत सरकारकडून प्रमाणपत्र प्रदानसलग दुसऱ्यांदा एटी स्पोर्ट्स लिंगायत प्रीमिअर लीगचा मानकरी ! बॅटरी पॉवर सोल्युशन्स उपविजेते !!कुलगुरुनंतर पुढे काय ? या प्रश्नावर डी. टी. शिर्के म्हणाले माझ्यासमोर एक मोठा....जिपमध्ये आता जीपीएफ ऑनलाइन, मोबाइल अॅपद्वारे कळणार प्रॉव्हिडंड फंडाचे स्टेटससंशोधकांनी जिथे समस्या आहेत त्या ठिकाणी संशोधनाला प्राधान्य द्यावे-डॉ. अभय बंगशहरातील वाहतूक-पार्किंगला शिस्त लागणार, सुट्टीच्या दिवशी शाळांच्या मैदानावर पे अँड पार्क !

जाहिरात

 

शिक्षक संघटनांची निदर्शने, रेखावारांना पदावरुन हटविण्याची मागणी

schedule08 Jun 25 person by visibility 227 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणास वेळेत पोहचण्यासाठी चिपळूणहून रत्नागिरीकडे  जाणाऱ्या शिक्षकांची मिनी बस व टँकरची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात २५ हून अधिक शिक्षक जखमी झाले आहेत.  राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण संस्थेचे राहूल रेखावार यांना या अपघातास कारणीभूत धरुन  त्यांची संचालक पदावरून हकालपट्टी कारवाई करावी अशी मागणी सर्व प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीचे  यांनी केली आहे.न्यू हायस्कूल येथे सुरू असलेल्या वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणस्थळी  जेवणाच्या सुट्टीच्या वेळेत एकत्रित येत सर्व शिक्षकांनी राहुल रेखावार यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.  यावेळी संघटना कृती समितीचे भरत रसाळे,राजेंद्र कोरे, सुधाकर सावंत, संतोष आयरे संजय पाटील सुरेश कांबळे  सुभाष धादवड सुनील पाटील इत्यादी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes