Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ज्युनिअर कॉलेजच्या संचमान्यतेवरुन आमदारांचा हल्लाबोल ! शिक्षण आयुक्त हटवा...शिक्षण क्षेत्र वाचवा !!उत्साह, स्वागत - नव्या संकल्पांसह जिल्हा परिषद शाळांची घंटा  वाजली !  प्रवेशोत्सवासह नशामुक्त कोल्हापूरची शपथ !! चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले, उपाध्यक्षपदी धनाजी यमकर, आनंद शिंदेजिप कर्मचारी सोसायटीतर्फे साडेबारा टक्के लाभांश, आजपासून सभासदांच्या खात्यावर रक्कम जमाभारताला विश्वगुरू बनविण्यासाठी प्रबुद्ध समाजाने पुढे यावे : शिवप्रकाशडॉ. योगेश गोडबोले यांची निवड गोकुळ परिवाराच्या कार्याचा गौरवथकित बिलासाठी शासकीय कंत्राटदारांचा सरकारच्या विरोधात आक्रोश ! बिलातील 54 टक्के रक्कम वाटपात, आमदारांना दहा टक्के - अधिकाऱ्यांना 15 टक्के !!लिंगायत माळी समाजाच्या सभागृह उभारणीला मोठी मदत करू - सत्यजीत कदम यादवनगर भागात विकास कामांचा प्रारंभ, माजी नगरसेवकांची उपस्थितीपदोन्नतीमध्ये सेवा ज्येष्ठ  शिक्षकांना डावलल्यास तीव्र आंदोलन - प्रसाद पाटील

जाहिरात

 

जिप कर्मचारी सोसायटीतर्फे साडेबारा टक्के लाभांश, आजपासून सभासदांच्या खात्यावर रक्कम जमा

schedule15 Jun 26 person by visibility 171 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीतर्फे सभासदांना १२.५० टक्के लाभांश वाटप करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष नंदीप मोरे यांनी सांगितले. सोमवारपासून (१५ जून २०२६) सभासदांच्या खात्यावर लाभांश व ठेव व्याज रक्कम जमा केली जाणार आहे.

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीची वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी झाली. सोसायटीच्या श्री महालक्ष्मी सभागृहात ही सभा झाली. याप्रसंगी सोसायटीतर्फे सभासदांच्या गुणवंत मुलांचा गौरव, ज्येष्ट सभासदांचा सन्मान, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच सत्कार करण्यात आला. चेअरमन मोरे यांनी सोसायटीच्या कामकाजाचा आढावा घेतला. वार्षिक लेखाजोखा मांडला. सोसायटीला २०२५ - २६ या आर्थिक वर्षात तीन कोटी साठ लाख रुपयांचा नफा झाला आहे. संस्थेच्या वाटचालीतील यंदाचा नफा हा सर्वाधिक आहे.

सभासद हित डोळयासमोर ठेवून सर्वसाधारण सभेत महत्वाचे निर्णय झाले. यामध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या सभासदांना ०.५० टक्के व्याज रिबेट, सभासदांची नियमित कर्जमर्यादा ३५ लाख रुपये, आकस्मिक कर्ज एक लाख व शैक्षणिक कर्ज तीन लाख रुपये असे निर्णय आहेत. सोसायटीतर्फे कोअर बँकिग प्रणाली आणि मोबाइल अॅप सेवा सुरू आहे. शिवाय स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सभासदांच्या पाल्यासाठी अद्ययावत ग्रंथालय आहे.

सभेला संचालक श्रीकांत चव्हाण, सुनील पाटील, रवींद्र जरळी, साताप्पा मगदूम, रणजीत पाटील, सुधाकर कांबळे, मुजम्मिल नावळेकर, अमर पाटील, सुरेश सुतार, अजय शिंदे, उत्तम वावरे,राहुलराज शेळके, बाजीराव पाटील, संजय शिंदे, सरोजिनी कोरी, महावीर सोळांकुरे आदी उपस्थित होते. प्रवीण पाटील यांनी स्वागत केले. व्यवस्थापक व्ही.एन. बोरगे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. उपाध्यक्ष जयकुमार रेळेकर यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes