Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ज्युनिअर कॉलेजच्या संचमान्यतेवरुन आमदारांचा हल्लाबोल ! शिक्षण आयुक्त हटवा...शिक्षण क्षेत्र वाचवा !!उत्साह, स्वागत - नव्या संकल्पांसह जिल्हा परिषद शाळांची घंटा  वाजली !  प्रवेशोत्सवासह नशामुक्त कोल्हापूरची शपथ !! चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले, उपाध्यक्षपदी धनाजी यमकर, आनंद शिंदेजिप कर्मचारी सोसायटीतर्फे साडेबारा टक्के लाभांश, आजपासून सभासदांच्या खात्यावर रक्कम जमाभारताला विश्वगुरू बनविण्यासाठी प्रबुद्ध समाजाने पुढे यावे : शिवप्रकाशडॉ. योगेश गोडबोले यांची निवड गोकुळ परिवाराच्या कार्याचा गौरवथकित बिलासाठी शासकीय कंत्राटदारांचा सरकारच्या विरोधात आक्रोश ! बिलातील 54 टक्के रक्कम वाटपात, आमदारांना दहा टक्के - अधिकाऱ्यांना 15 टक्के !!लिंगायत माळी समाजाच्या सभागृह उभारणीला मोठी मदत करू - सत्यजीत कदम यादवनगर भागात विकास कामांचा प्रारंभ, माजी नगरसेवकांची उपस्थितीपदोन्नतीमध्ये सेवा ज्येष्ठ  शिक्षकांना डावलल्यास तीव्र आंदोलन - प्रसाद पाटील

जाहिरात

 

ज्युनिअर कॉलेजच्या संचमान्यतेवरुन आमदारांचा हल्लाबोल ! शिक्षण आयुक्त हटवा...शिक्षण क्षेत्र वाचवा !!

schedule15 Jun 26 person by visibility 281 categoryशैक्षणिक

ज्युनिअर कॉलेज शिक्षक संचमान्यता स्वीकारायची नाही, हात उंचावून घेतला निर्णय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर : ‘अनुदानित माध्यमिक शाळा बंद कशा पडतील अशाच पद्धतीने राज्याच्या शिक्षण आयुक्तांचे काम सुरू आहे. शिक्षण क्षेत्र व्यवस्थित ठेवायचे असेल तर शिक्षण आयुक्तांना हटवा. मुळात त्यांना शिक्षणक्षेत्रातील काही कळत नाही.’ असा हल्लाबोल शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केला. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या अन्यायी संचमान्यतेविरूध्द कोल्हापूर जिल्हा  शैक्षणिक व्यासपीठ व कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत ‘कोणीही संचमान्यता स्वीकारायची नाही.’असा निर्णय घेण्यात आला. या अन्यायकारक संचमान्यतेविरूध्द कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ तीव्र आंदोलन केले जाईल. संचमान्यता धोरणाविरूध्द विधानमंडळात लक्षवेधी सूचना मांडणार आहे असा इशारा आमदार आसगावकर यांनी दिला.

शिवाजी पार्क येथील मुख्याध्यापक संघाच्या सभागृहात ही बैठक झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड होते. शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्यासाठी आता ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक संच मान्यता जाहीर केली. त्याला कडाडून विरोध करण्यात आला. शिक्षण उपसंचालकांनी संच मान्यतेला स्थगिती देत असल्याचे सांगितले असले तरी भविष्यकाळात हा धोका उदभवून शकते. म्हणून  या संचमान्यतेविरोधात राज्य पातळीवर आंदोलन करण्याचे नियोजन कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाने करावे. संच मान्यता पूर्वीप्रमाणेच ऑफलाइन पद्धतीने करावे. आनॅलाइन संच मान्यतेला विरोध कायम राहील. आंदोलनाचा एक भाग म्हणून हजारोंच्या संख्येने आझाद मैदान येथे आंदोलन करू या असा इशारा यावेळी बैठकीत देण्यात आला.

  ‘महाराष्ट्राच्या शिक्षण आयुक्तांनी लादलेल्या संचमान्यता निकषांमुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची अनेक पदे अतिरिक्त ठरणार आहेत, शारीरिक शिक्षण व पर्यावरण विषयांचा कार्यभार वाटून दिल्याने अनेक पूर्णवेळ व अर्धवेळ शिक्षकांची पदे कमी होणार आहेत, प्रॅक्टिकलची बॅच ३० विद्यार्थ्यांची केल्याने पदे कमी होतील, अनेक सी. एच. बी. शिक्षकांचा कार्यभार शून्य होणार आहे तसेच महाविद्यालयांना जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या तासिका ४० मिनिटांच्या केल्याने सुध्दा शिक्षकांचेवर अनिष्ठ परिणाम होणार आहेत तसेच दोन विषयांचा कार्यभार एकत्र धरलेला नाही त्याचे सुध्दा अनिष्ठ परिणाम होणार आहेत,’अशा भावना बैठकीत उमटल्या.

 सभेत प्रा. बी. एस. पाटील, प्रा. एस. व्ही. मोरे, प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, प्रा. रत्नाकर माळी, भैय्या माने, प्रा. दिलीप शितोळे, प्रा. सी.एम. गायकवाड, आर. वाय. पाटील, प्रा. गंगाधर माने  आदिंनी मनोगते व्यक्त केली. अध्यक्ष एस. डी. लाड यांनी सर्वांना आवाहन केले की कनिष्ठ महाविद्यालांनी अन्यायी संचमान्यता स्वीकारू नये. असल्याचे आ. जयंत आसगांवकर यानी सभेत जाहीर केले.
    या सभेस बी.जी. बोराडे,  दादासाहेब लाड, बाबा पाटील, एन. आर. भोसले, आर.डी. पाटील, बसवराज वस्त्रद, प्रा. आण्णासाहेब बागडी, प्रा. अभिजात दुर्गी, जगदीश शिर्के, डॉ. उर्मिला सूर्यवंशी, माधवी माळी, डॉ. स्मिता वणिरे, अजित रणदिवे, प्रा. एस. व्ही. गुरबे व प्रा. आर. पी. पाटील, उदय पाटील, सुधाकर निर्मळे, प्रा.बी. के. मडिवाळ, प्रा. संध्या नागन्नावर अलका दत्तात्रय पाटील, वर्षाराणी देसाई, जयमाला पाटील, प्रा. जयसिंग दिंडे, प्रा. एस.जी.पाथरे आदी उपस्थित होते.
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes