युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते सुवर्णालंकारित तोरणाचे पूजन
schedule02 Jun 26 person by visibility 22 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन : हलगी-घुमकं आणि कैताळच्या कडकडाटात, बाराबंदी पोशाखातील मावळे तसेच आंबिल, घुगऱ्या, भाकरी-वडीचा नैवेद्य घेऊन आलेल्या युवतींच्या उपस्थितीत दुर्गराज रायगडावरील महादरवाजाला बांधण्यात येणाऱ्या सुवर्णालंकारित तोरणाचे मंगळवारी पूजन करण्यात आले. युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते हा विधी पार पडला.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे ५ व ६ जून रोजी रायगडावर ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यानिमित्त इतिहास, दुर्गसंवर्धन आणि शिवकालीन परंपरा जपणाऱ्या संस्था-संघटनांना विविध मान देण्यात आले असून, महादरवाजाला तोरण बांधण्याचा मान यंदा कोल्हापूरच्या सह्याद्री प्रतिष्ठानला मिळाला आहे.
युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेले सुमारे १२ फूट लांबीचे हे तोरण भवानी मंडपातून तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणण्यात आले. प्रतिष्ठानच्या युवतींनी आंबिल, घुगऱ्या, भाकरी-वडीचा नैवेद्य सादर केला. बाराबंदी पोशाखातील राजेंद्र काटकर, योगेश वेटाळे, शुभम कोळी, केतन कांबळे, राजवर्धन आडनाईक आणि पार्थ माजगावकर यांनी तोरण वाहून नेले. तर साक्षी राऊत, राजनंदिनी पाटील, शर्वरी वडर, प्राची जाधव, इंद्राक्षी भोसले, जान्हवी बोडके, साक्षी पाटील, रेणू माळी, शौर्या थोरवत आणि वैभवी आळवेकर या युवती मराठमोळ्या वेशभूषेत डोक्यावर घागरी घेऊन सहभागी झाल्या होत्या.
यावेळी मूर्तीकार अशोक सुतार, फत्तेसिंह सावंत, हेमंत साळोखे, सुखदेव गिरी, प्रवीण हुबाळे, प्रसन्न मोहिते, उदय घोरपडे, धनाजी खोत, प्रदीप थोरवत, अमर पाटील यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
......
तोरणावर शिवकालीन वैभवाची झलक
मूर्तीकार अशोक सुतार यांनी ब्रास ऑइल माध्यमातून हे सुवर्णालंकारित तोरण साकारले आहे. तोरणावर गणपती, स्वस्तिक, सुवर्णहोन, मोर, पोपट, छत्र, घुंगुरू यांसह शिवकालीन राजवैभवाचे प्रतीक असलेले सोन्याचा मुलामा दिलेले कलश साकारण्यात आले आहेत. पूजनानंतर या आकर्षक तोरणासमवेत छायाचित्रे टिपण्यासाठी शिवभक्त आणि पर्यटकांनी मोठी गर्दी केली.