Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते सुवर्णालंकारित तोरणाचे पूजन डॉ. शिवाजीराव कदम यांच्याकडून प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींगला 25 लाखाची देणगी डी. सी. कुंभारांना तीन दिवसाची पोलिस कोठडीनीट -  सीबीएसई परीक्षतील घोटाळ्यांविरोधात काँग्रेसचा कँडल मार्चशिवराज्याभिषेक सोहळयासाठी कोल्हापूर हायकर्सतर्फे जल संकलनआठवणीतीले दवबिंदू कवितासंग्रहातून आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची मानसिकता लाभते– प्राचार्य जी.पी.माळीनिरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती – भरत रसाळेकोल्हापुरात गुरुवारी महाराष्ट्र धर्म याविषयी परिषदकोल्हापूर मेट्रोसिटीसाठी राजू मानेंचे धरणे आंदोलनराष्ट्र सेवा दलातर्फे दोन दिवसीय कार्यकर्ता कार्यशाळा - जिल्हास्तरीय मेळावा

जाहिरात

 

राष्ट्र सेवा दलातर्फे दोन दिवसीय कार्यकर्ता कार्यशाळा - जिल्हास्तरीय मेळावा

schedule01 Jun 26 person by visibility 172 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :- समताधिष्ठित समाज निर्मिती हे ध्येय घेऊन राष्ट्रसेवा दल ही संघटना देशभर कार्यरत आहे. या संघटनेचा  चार जून स्थापनादिन असून यानिमित्ताने कोल्हापूर येथे राज्यस्तरीय प्रमुख कार्यकर्ता कार्यशाळा व जिल्हास्तरीय मेळावा आयोजित केला आहे. तीन व चार जून २०२६ रोजी हे कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती मेळाव्याचे अध्यक्ष व अखिल भारतीय माजी अध्यक्ष भरत लाटकर आणि स्वागताध्यक्ष डॉ. प्रवीण कोडोलीकर यांनी दिली.
     फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारधारा आणि संविधानाच्या मुख्य उद्देशानुसार शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरील तरुण, वंचित घटक, आपत्ती निवारण यांच्या मध्ये संघटनेचे कार्य अविरत सुरू आहे. ४ जून १९४१ रोजी पुण्यात साने गुरुजी, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, आणि शिरूभाऊ लिमये या समाजवादी विचारवंतांच्या पुढाकारणे या संघटनेची पुनर्घटना करण्यात आली. गेली ८५ वर्षे ही संघटना कार्यरत आहे. 
        या निमित्ताने कोल्हापूर येथील कोरगावकर हायस्कूलमध्ये ३ जून ला संघटनेची जबाबदारी घेऊन काम करणाऱ्या राज्य भारतील निवडक १५० कार्यकर्त्याची कार्यशाळा आयोजित केली असून यातून भविष्यातील कार्यपद्धती ठरविली जाणार आहे. याचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत सुनीलकुमार लवटे, आंतरभारती शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्ष पल्लवी कोरगावकर, ख्यातनाम ओडिसी नृत्यकार झेलम परांजपे, सेवा दलाचे माजी अध्यक्ष प्रकाश कांबळे, चित्रकार राजा अवसक यांच्या उपस्थितीत होणार आहे. चार जून रोजी कोल्हापूर जिल्हा कार्यकर्ता मेळावा होणार असून यासाठी खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील, पत्रकार युवराज मोहिते यासह संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते यांची अतिथी म्हणून उपस्थिती असणार आहे. मेळाव्याच्या निमित्ताने छत्रपती राजर्षी शाहू महाराज जन्मस्थळ, महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना मोटरसायकल रॅलीद्वारे अभिवादन करण्यात येणार आहे.
या कार्यशाळेच्या यशस्वितेसाठ कोल्हापूर शहर जिल्हा कार्याध्यक्ष विजय भोगम, कोल्हापूर ग्रामीणचे कार्याध्यक्ष रावसाहेब आला असे, इचलकरंजी शहराध्यक्ष अनिल होगाडे, नगरसेवक राजेश लाटकर, माझी कार्याध्यक्ष श्रेणिक डिग्रजे, धनंजय धोत्रे, सुनील पोवार, पूर्ण वेळ सेवक बाबासाहेब नदाफ, चंदन माटुंगे इंद्रायणी पाटील, हेमलता पाटील, माजी नगरसेवक महेश जाधव आदी प्रयत्नशील आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes