कोल्हापुरात गुरुवारी महाराष्ट्र धर्म याविषयी परिषद
schedule02 Jun 26 person by visibility 29 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मराठी अभ्यास केंद्र मुंबईतर्फे ‘महाराष्ट्र धर्म’या विषयावर चार जून २०२६ रोजी शिबिर आयोजित केले आहे. महावीर कॉलेज येथे दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत शिबिर होणार आहे अशी माहिती संयोजक व केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार, डॉ. प्रकाश परब यांनी दिली. या शिबिरात मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ.पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी हे ‘शेती, शेतकरी आणि महाराष्ट्रधर्म’ तर अर्थतज्ज्ञ डॉ. नीरज हातेकर हे ‘मराठी माणसाचा रोजगार आणि महाराष्ट्रधर्म’या विषयावर बोलणार आहेत. मुफिद मुजावर हे ‘मराठी मुस्लिम समाज आणि महाराष्ट्र धर्म’ तरडॉ. प्रकाश परब हे ’धर्म, भाषा आणि महाराष्ट्र धर्म’ याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. सध्यस्थितीतील महाराष्ट्रातील आव्हाने समजून घेण्यासाठी आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी खुली चर्चा होईल. तसेच प्रश्नोत्तरांचे एक विशेष सत्र होणार आहे. या शिबिराला नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.