करवीर निवासिनी अंबाबाई देवीची प्रत्यंगिरा रूपात पूजा
schedule09 Oct 24 person by visibility 527 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी, बुधवारी करवीर निवासिनी अंबाबाई देवीची पूजा प्रत्यंगिरा रूपात सजली आहे. प्रत्यंगिरा आदिशक्तीचे एक विनाशक रूप मानले जाते. हिरण्यकश्यपू वधानंतर क्रोधाविष्ट झालेल्या नरसिंहाला शांत करण्यासाठी भगवान शंकरांनी शरभ अवतार धारण केला यावेळी त्यांच्याबरोबर मदतीला देवी प्रत्यंगिरेचा अवतार झाला. हातामध्ये चंद्रहास खड्ग, त्रिशूल डमरू आणि पानपात्र ही चार आयुधे धारण करून सिन्हा वरती विराजमान झालेली आहे. सिंह मुखी व सिंहवाहिनी अशीही भगवती प्रत्यंगिरा भक्ताच्या भयाचा नाश करते या स्वरुपाची पूजा आहे.
कोल्हापुरात नवदुर्गांपैकी एक तसेच पुण्यात जवळ कुरकुंभ येथे प्रत्यंगिरेची उपासना फिरंगाई या नावाने केली जाते. या देवीला भय तसेच नकारात्मकता दूर करणारी देवी असे म्हटले जाते काही ठिकाणी प्रत्यंगिरादेवीला अथर्वर्ण भद्रकाली असेही म्हटले आहे.