Maharashtra News 1
Register

जाहिरात

 

पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये ६०० विद्यार्थिनींना मोफत एचपीव्ही लसीकरण

schedule02 Aug 25 person by visibility 42 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  “खुद से जीत” या प्रेरणादायी संकल्पनेला साकारत हसन मुश्रीफ फाऊंडेशन आणि इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३१७ संचलित इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे मोफत एचपीव्ही लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. दोन दिवसात तब्बल ६०० विद्यार्थिनींना दिली. प्रथम विद्यार्थिनींनी पालकांचे संमती पत्र भरून दिले. लस टोचणे अगोदर नाश्ता देवून अर्ध्या तासानंतर लस टोचून वर्गात बसविले. कोल्हापूर शहरातील प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल ही एचपीव्ही लस मुलींना देणारी पहिली शाळा ठरली आहे. या उपक्रमात इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३१७च्या चेअरमन उत्कर्षा पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका एस.आर. पाटील, इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरच्या अध्यक्षा रुक्मिणी हेगिष्टे, सचिव स्मिता घोसाळकर, खजिनदार सोनाली चौधरी, आयएसओ ज्योती रेड्डी, आयपीपी डॉ. मनीषा चव्हाण, तसेच माजी अध्यक्ष हेमा भोसले, बीना मोहिते, स्वाती गुने, शर्मिष्ठा चौगुले, मनीषा संकपाळ, आणि क्लबच्या सदस्यांमध्ये प्राची चव्हाण, उषा पाटणकर, शीतल नर्सिंघाणी, पूनम नर्सिंघाणी शाळेचे पर्यवेक्षक ए डी भोई,एस एस इनामदार यु आर भेंडेगिरी , वैजयंती पाटील यांची उपस्थिती होती. तसेच छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सीपीआर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे यांनी सहकार्य केले.  

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes