Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आयुक्त अॅक्शन मोडवर, नेत्रदीप सरनोबत, रमेश कांबळेंची खातेनिहाय चौकशी ! तीन अधिकारी निलंबित ! !प्रत्येक तालुक्यातील एका गावात प्लास्टिक कचरा प्रक्रिया केंद्र शिक्षक बदली पोर्टलमधील अअनियमितता दूर करा, अन्यथा कोर्टात दाद मागणार : पुरोगामी शिक्षक संघटनापालक सहभागातून वर्गाचा कायापालट, नेहरुनगर विद्यामंदिरातवारणा समूह विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदी डॉ. दिगंबर शिर्केमला पैसे खायला आवडतात-माझं पगारात भागत नाही : महापालिकेतील भ्रष्ट यंत्रणेविरुद्ध आपचे आंदोलनन्यू वूमेन्स कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक निसर्ग संवर्धन दिन उत्साहातसिद्धगिरी हॉस्पिटलचा सेवाभाव, एक लाखात एंडोस्कोपिक कि - होल शस्त्रक्रिया शिक्षकांच्या चौथ्या टप्प्यातील बदलीसाठी प्राधान्यक्रम नोंदविण्याची सुविधा उपलब्धआशा- गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीतर्फे पालकमंत्र्यांना निवेदन

जाहिरात

 

न्यू वूमेन्स कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक निसर्ग संवर्धन दिन उत्साहात

schedule28 Jul 25 person by visibility 35 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचालित,न्यू वुमेन्स कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक निसर्ग संवर्धन दिन उत्साहात साजरा करण्यात झाला. दरवर्षी २८ जुलै रोजी जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा केला जातो. हा दिवस निसर्ग आणि पर्यावरणाचे महत्त्व दर्शवतो. स्वच्छ पर्यावरण हा निरोगी आणि स्थिर मानवी समाजाचा पाया आहे हे मान्य करण्यासाठी या दिवशी जगभरात विशेष जनजागृती मोहिमेचे आयोजन केले जाते. निसर्गाचे रक्षण करणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयांध्ये दुर्मिळ औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले व संवर्धन करण्याची शपथ घेण्यात आली. या औषधी वनस्पती द्वितीय वर्षांच्या विद्यार्थिनींनी महाविद्यालयास भेट दिल्या. यावेळी विद्यार्थिनींनी पोस्टर द्वारे प्रबोधन केले. यासाठी प्रा. निकिता शेटे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी चेअरमन के. जी. पाटील, आजीव सेवक  उदय पाटील, कॉलेजचे प्राचार्य डॉ.रविंद्र कुंभार उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes