सिद्धगिरी हॉस्पिटलचा सेवाभाव, एक लाखात एंडोस्कोपिक कि - होल शस्त्रक्रिया
schedule28 Jul 25 person by visibility 121 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर : " सेवाभावी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अशी ओळख असलेल्या सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मध्ये मेंदूच्या 500 पेक्षा अधिक जटील अशा एन्डोस्कोपिक की होल शस्त्रक्रिया करण्यात आले आहेत. अशी माहिती हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक व प्रसिद्ध निरोपर्जन डॉक्टर शिवशंकर मरजक्के यांनी पत्रकार परिषदेत दिली. भारतातील केवळ मेट्रो सिटी मधील मोजक्यात हॉस्पिटलमध्ये सर्व उपक्रमास केली जाणारी एंडोस्कोपिक की होल शस्त्रक्रिया सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये माफक दरात केली जाते असेही त्यांनी सांगितले. या शस्त्रक्रियेमुळे चिरफाड न करता आणि जलदगतीने उपचार होतात असेही ते म्हणाले.
डॉ.मरजक्के म्हणाले, मेंदूच्या अनेक विकारात इंडॉस्कॉपी की होल शस्त्रक्रिया गरजेचे असते. आधुनिक उपकरणे वापरून व अद्यावत एन्डोस्कोप वापरून सर्जरी रुग्णासाठी उपयुक्त ठरत आहे. मायक्रोस्कोप तंत्रज्ञान, न्यूरो नेव्हिगेशन मशीन, न्यूरो मॉनेटरिंग प्रणालीसह अनुभवी न्यूरो शस्त्रक्रियातज्ञ उपलब्ध आहेत. एंडोस्कोपिक की होल शस्त्रक्रियेसाठी इतर रुग्णालयात सुमारे दहा ते बारा लाख रुपये खर्च होतो तर शेतकरी हॉस्पिटलमध्ये केवळ एक लाख रुपये इतक्या नाममात्र खर्चात ही शस्त्रक्रिया होते. असेही त्यांनी सांगितले. त्यांनी व्हिडिओ माध्यमांच्या द्वारे जटील व जखमेचे शस्त्रक्रिया कशी केली जाते हे दाखविले. पुणे मुंबई व बेंगलोर या मेट्रो सिटी नंतर मेंदू शस्त्रक्रिया करता अत्याधुनिक अशी इंडोस्कोप केवळ सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये कार्यान्वित आहे. इंडोस्कॉपिक सर्जरीमुळे मेंदूच्या मुख्य भागातील ट्युमर काढणे गाठी काढणे यासह बायपास करता हे अत्यंत उपयुक्त ठरते. याशिवाय नाकाच्या वरील व मेंदूच्या खालील भागात काही गाठी, ट्युमर असतील तर ते काढण्यासाठी एन्डोस्कोप चा वापर केला जातो. रुग्णांनी या वैद्यकीय सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. पत्रकार परिषदेला हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक व न्यूरो भूलतज्ज्ञ डॉ. प्रकाश भरमगौडर, विवेक सिद्ध, राजेंद्र शिंदे, पंकज पाटील, कुमार चव्हाण व अजय कांबळे उपस्थित होते.