शिक्षकांच्या चौथ्या टप्प्यातील बदलीसाठी प्राधान्यक्रम नोंदविण्याची सुविधा उपलब्ध
schedule28 Jul 25 person by visibility 92 categoryशैक्षणिक
महाराष्ट न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील शिक्षक बदली प्रक्रिया २०२५ अंतर्गत बदली अधिकार पात्र (टप्पा क्रमांक चार ) मधील शिक्षकांना २८ जुलै ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत बदलीसाठी शाळांच्या प्राधान्यक्रम नोंद करण्यासाठीची सुविधा उपलब्ध झाली आहे. या संवर्गातील पात्र शिक्षकांना आवश्यक असलेली सुधारित रिक्त पदांची यादी २७ जुलै रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिनवरुन प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी सर्व शिक्षकांना त्यांच्या लॉगीनवरुन पाहता येईल. २८ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत बदली अधिकार पात्र मधील सर्व शिक्षकांना त्यांच्या लॉगीनवरुन बदलीकरिता शाळांचा प्राधान्यक्रम काळजीपूर्वक निवडावे. तसेच ३१ जुलै २०२५ नंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही. प्राधान्यक्रम निवडणे ही संबंधित शिक्षकांची जबाबदारी असल्यामुळे या प्रकियेत कोणत्याही प्रकारची चूक झाल्यास त्याची जबाबदारी शिक्षकांवर राहील.बदलीसाठी पर्याय निवडल्यानंतर, त्या पर्यायांची पडताळणी करुन आपला अर्ज अंतिम करुन ऑनलाइन पोर्टलवर समाविष्ठ झाल्याची खातरजमा करावी. तसेच अंतिम केलेल्या अर्जाची हॉर्डकॉपी जतन करुन ठेवावे असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी केले आहे.