आशा- गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीतर्फे पालकमंत्र्यांना निवेदन
schedule27 Jul 25 person by visibility 41 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्यावतीने पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. गारगोटी येथील निवासस्थानी पालकमंत्र्यांची भेट घेतली. गटप्रवर्तक फेडरेशनच्यावतीने गटप्रवर्तक यांचे प्रलंबित असणारे प्रश्न, गटप्रवर्तक समायोजन,सॉफ्टवेअर एन्ट्री चे मानधन, सादिलवार खर्च, मोबाईल रिचार्ज,आरोग्यवर्धिनीमद्ये समायोजन या मागण्यांचे निवेदन दिले. शिष्टमंडळात उज्वला पाटील, मनीषा पाटील, सारिका पाटील, संगीता कमते, प्रतिभा इंदुलकर, वर्षा तेली, मंगल कापरे, प्रियांका पाटील, सुजाता फराकटे, जयश्री काळुगडे, राणी सावर्डेकर, साधना सुतार, स्मिता पवार, वैशाली चौगुले यांचा समावेश होता