Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरातील कवी - लेखक - प्राध्यापक – शिक्षक एकवटले, शनिवारी करणार धरणे आंदोलन ! जंतरमंतरवरील तरुणांचे वाढविणार मनोबल!शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशाकांत कोल्हापूर देशात द्वितीय स्थानावरभारतीय मजदूर संघाचा ७२ वा वर्धापनदिन  साजरा,शिवसाई मंडळाची विद्यार्थी दत्तक योजना होतकरू मुलांच्या स्वप्नांना बळ देणारी - डॉ. संपत खिलारी महिला नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रगतीशील शेतकरी बनतील - शौमिका महाडिक४१० दूध संस्थेविषयी शौमिका महाडिकांचे प्रेम हे पुतना मावशीचे, सभासदांचे पत्रकविद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ कोल्हापुरात वंचित - डाव्या आघाडीची रॅलीकोल्हापुरात आंदोलनांचे जंतर-मंतर ! भाजप - काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात रस्त्यावर, प्रचंड घोषणाबाजी ! !गडहिंग्लजमधील आरटीई २५ टक्के प्रवेशातील  अनियमिततेची चौकशी; त्रिसदस्यीय समिती नियुक्तखोट्याला संरक्षण द्यायच्या नावाखाली नेत्यांनी खऱ्यांवर अन्याय करू नये : सुधीर मसवेकर

जाहिरात

 

खोट्याला संरक्षण द्यायच्या नावाखाली नेत्यांनी खऱ्यांवर अन्याय करू नये : सुधीर मसवेकर

schedule23 Jul 26 person by visibility 53 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘आमच्यासारख्या जुन्या ३६०० प्राथमिक दूध संस्थानी हे सगळे संघ नियम आजवर पाळले आहेत. आता नियम मोडले तर उद्या प्रत्येक जण याच पद्धतीने सभासदत्व मिळवून मताची बेरीज करून ठेवेल व ही पद्धत गोकुळ दूध संघ हिताच्या दृष्टीने घातक आहे त्यामुळे म्हातारी मेल्याचे दुःख नाही काळ सोकावायला नको ही आमची माफक अपेक्षा आहे. त्यामुळे खोट्याला संरक्षण द्यायच्या नावाखाली नेत्यांनी खऱ्यांवर अन्याय करू नये. अशा संस्थांना राजकीय संरक्षण पुरवणाऱ्याना आम्हीसुद्धा एकजुटीने मतदानातून ताकत दाखवून देऊ. ’’असे पत्रक कागल तालुक्यातील श्री विठ्ठल रखुमाई सह दूध संस्था, मर्यादित करंजीवणेचे चेअरमन सुधीर अर्ज़न मसवेकर यांनी काढले आहे.

 कोल्हापूर जिल्ह्यातील 410 प्राथमिक दूध संस्थांना गोकुळ प्रशासन कडून नोटिसा जाताच त्या संस्थांचे सभासदत्व टिकेल की नाही हा विषय सध्या ऐरणीवर आला आहे.संबंधित दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी प्रशासनाच्या धोरणाला विरोध केला आहे. शिवाय गोकुळच्या पंधरा माजी संचालकांनी एकत्र येत्र ४१० दूध संस्थांना नोटीसा काढण्याचा निर्णय बेकायदेशीर आहे असे म्हटले आहे. या दूध संस्थांच्या कारवाईवरुन उलटसुलट चर्चा रंगली आहे.

या पार्श्वभूमीवर मसवेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकांत म्हटले आहे, त्या संस्थांना नैसर्गिक न्याय प्रक्रियेद्वारे सभासदत्व टिकावे ही आमची देखील भूमिका आहे. पण काही उत्साही नेते मंडळी त्या संस्थांची सहनभूती मिळावी यासाठी चुकीची आश्वासने देऊन संघ प्रशासकाबद्दल डोकी भडकवण्याचे काम करत आहे. मुळात ज्या एमडीनी सभासदत्व दिले त्यांच्याच सहीने पुन्हा सभासदत्व रद्द का करू नये असा खुलासा मागवला याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने नोंदणी झाली आहे हे एमडी व संघ प्रशासनाने मान्य केले आहे. सभासदत्व देताना संघ पोटनियम या लोकांना माहित न्हवते का ? त्यांच्या बरोबर एवढे मोठे जेष्ठ संचालक होते, त्यांना या नियमाचा विसर पडला होता का ? की त्यांनी या कडे सोयीस्कररित्या डोळे झाक केली? हा आमचा प्रश्न आहे. जर नेतेमंडळींना  वाटत असेल की पोटनियम पालन न करणाऱ्या संस्था टिकल्या पाहिजेत. तर त्यांनी आमचेही सर्व नियम शिथिल करावेत. आम्हालाही नियमातून सूट द्यावी. खऱ्या अर्थाने आम्ही रोज लाखो लिटर दूध संकलित करून संघाला देतो. पण दुधासाठी आम्ही पाहिजे आणि मतांसाठी मात्र आमचा हक्क विभागण्यासाठी बोगस मतदार उभा करायचा , हे आम्ही खपवून घेऊ शकत नाही. त्यामुळे जर एखादी संस्था पोटनियमांचे पालन करत नसेल तर त्यावर योग्य कारवाई झालीच पाहिजे, अशी आम्हा सर्व जुन्या सभासदांची भूमिका आहे.’

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes