Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वार्षिक तपासणीवेळी प्रत्येक मुख्याध्यापकाकडे शाळेची यशोगाथा हवी ;  सहविचार सभेत उपशिक्षणाधिकाऱ्यांनी केली १७ विषयांवर चर्चादिवा विझला कायमचा….शिक्षक पात्रता परीक्षा होणार ऑनलाइन ! राज्य परीक्षा परिषदेचे आयबीपीएसला पत्र ! !उद्योगांनी नावीन्य - गुणवत्ता - आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनावे - खासदार धनंजय महाडिकमहादेव डावरे यांचे कार्य  शिक्षकांना दिशादर्शक : भरत रसाळेमहिला - बाल कल्याण देणार मशरुम-आटाविरहीत व्हीट ब्रेड तयारचे प्रशिक्षणडॉ. संजय डी. पाटील यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार प्रदानगोकुळच्या माजी चेअरमनांची टोलेबाजी ! जुळे भाऊपासून बापापर्यंत उपमा, जिल्ह्यातील नेत्यांचाही चिमटा ! !शिक्षण विभागातील अकरा अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोल्हापूर - सांगलीतील अधिकाऱ्यांचा समावेश श्रीपूजक मंडळ - समिधा प्रतिष्ठानतर्फे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

जाहिरात

 

महिला - बाल कल्याण देणार मशरुम-आटाविरहीत व्हीट ब्रेड तयारचे प्रशिक्षण

schedule02 Jul 26 person by visibility 108 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीची सभा नुकतीच झाली. सभापती विद्या विलास पाटील या अध्यक्षस्थानी होत्या. या सभेमध्ये जिल्ह्यातील कुपोषणमुक्ती, अंगणवाडी इमारती, पोषण आहार आणि महिला सक्षमीकरणाच्या विविध योजनावर चर्चा झाली. महिला व मुलींना आर्थिक दृष्टया सक्षम करणे, बालकांना घरच्या घरी पोषण मिळण्यासाठी  जिल्हा परिषद सेस फंडातून ‘मशरुम व आटाविरहीत व्हीट ब्रेड’ तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे यासंबंधीचा निर्णय सभेत झाला.

जिल्ह्यातील अनेक अंगणवाडयावर सोलर यंत्रणा बसविली असताना वीज कनेक्शन जोडले नाहीत याची दखल घेऊन सभापती पाटील यांनी, ‘सोलर पॅनेल असलेल्या सर्व अंगणवाड्यामध्ये नियमित वीज कनेक्शन जोडण्याचे आदेश दिले. तसेच ज्या गावांमध्ये अंगणवाडयांना स्वतची इमारत नाही त्यांनी गायरान जमिनीसाठी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवावेत असे सांगितले. गरोदर मातांना मिळणाऱ्या टीएचआर आहाराचा दर्जा खालावल्याबद्दल सदस्यांनी चिंता व्यक्त केली. कुपोषित बालकासाठी पंचायत समिती सेस फंड तसेच सीएसआर फंडातून फूड बास्केट व टॉनिक पुरविण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

 ऑनलाइन प्रणालीतील त्रुटीमुळे २५० दिवसानंतर नोंदणी न होऊ शकणाऱ्या गरोदर मातांना मातृवंदना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन स्तरावर पावले उचलावीत अशा सूचना सभापती पाटील यांनी केल्या.  याप्रसंगी झालेल्या चर्चेत सदस्या रोहिणी आबिटकर, शिवानी भोसले, विनिता भोगम, वर्षाराणी पाटील, संयोगिता मोरे, सोनाली पाटील, गडहिंग्लजच्या सभापती डॉ. प्रतिभा चव्हाण यांनी सहभाग घेतला.जिल्हा कार्यक्रम अधिकारी व सदस्य सचिव नितीन मस्के, बाल विकास प्रकल्प अधिकारी व अधीक्षक उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes