Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वार्षिक तपासणीवेळी प्रत्येक मुख्याध्यापकाकडे शाळेची यशोगाथा हवी ;  सहविचार सभेत उपशिक्षणाधिकाऱ्यांनी केली १७ विषयांवर चर्चादिवा विझला कायमचा….शिक्षक पात्रता परीक्षा होणार ऑनलाइन ! राज्य परीक्षा परिषदेचे आयबीपीएसला पत्र ! !उद्योगांनी नावीन्य - गुणवत्ता - आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनावे - खासदार धनंजय महाडिकमहादेव डावरे यांचे कार्य  शिक्षकांना दिशादर्शक : भरत रसाळेमहिला - बाल कल्याण देणार मशरुम-आटाविरहीत व्हीट ब्रेड तयारचे प्रशिक्षणडॉ. संजय डी. पाटील यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार प्रदानगोकुळच्या माजी चेअरमनांची टोलेबाजी ! जुळे भाऊपासून बापापर्यंत उपमा, जिल्ह्यातील नेत्यांचाही चिमटा ! !शिक्षण विभागातील अकरा अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोल्हापूर - सांगलीतील अधिकाऱ्यांचा समावेश श्रीपूजक मंडळ - समिधा प्रतिष्ठानतर्फे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

जाहिरात

 

डॉ. संजय डी. पाटील यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार प्रदान

schedule02 Jul 26 person by visibility 42 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र सरकारच्यावतीने कृषी क्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जाणारा ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार’ डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना प्रदान करण्यात आला. राज्यपाल डॉ. विष्णु देव शर्मा यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. डॉ. संजय पाटील यांनी पत्नी वैजयंती यांच्यासमवेत हा पुरस्कार स्वीकारला. कृषी विभागातर्फे २०२३ व २०२४ च्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण मुंबईतील वरळीमधील सरदार वल्लभभाई स्टेडियम येथे झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, फलोत्पादनमंत्री भरत गोगावले, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, कृषी सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक रफिक नायकवडी आदी उपस्थित होते.याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनीही डॉ. संजय डी. पाटील यांच्या शेती, शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील कार्याचे कौतुक केले. शेती आणि शेतकऱ्यांसाठी ते अखंडपणे कार्यरत आहेत. तीन विद्यापीठाचे कुलपती म्हणून शैक्षणिक क्षेत्रात मोठे कार्य केले आहे असे उद्गगार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले.कृषिमंत्री भरणे यांनी, डॉ. संजय डी. पाटील यांनी आधुनिक व प्रयोगशील शेतीद्वारे कृषी क्षेत्रात मोठे कार्य केल्याचे सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes