सलग दुसऱ्यांदा एटी स्पोर्ट्स लिंगायत प्रीमिअर लीगचा मानकरी ! बॅटरी पॉवर सोल्युशन्स उपविजेते !!
schedule20 Jun 25 person by visibility 317 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर येथे झालेल्या लिंगायत प्रीमिअर लीगच्या रोमहर्षक आणि अटीतटीच्या अंतिम सामन्यात अरुण तेली पुरस्कृत एटी स्पोर्ट्सने शानदार विजय मिळविला. रावसाहेब चिंचणे पुरस्कृत बॅटरी पॉवर सोल्युशनला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्याचा सामनावीर युवराज पाटील, मॅन ऑफ दी सिरीजचा किताब आदर्श माळी, सर्वोकृष्ठ फलंदाज सौरभ माळी तर सर्वोकृष्ठ गोलंदाज सुदर्शन खोचगे ठरले. स्पर्धेमध्ये एकूण १७ सामने झाले. कोल्हापूरसह रत्नागिरी, सिधुदुर्ग, मुंबई येथून एकूण १५० पेक्षा अधिक खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.
स्पर्धेमध्ये एकूण आठ संघांनी सहभाग नोंदविला. यामध्ये अरुण तेली पुरस्कृत एटी स्पोर्ट्स, रावसाहेब चिंचणे पुरस्कृत बॅटरी पॉवर सोल्युशन, विजयराज खोबरे पुरस्कृत रिपब्लिक वॉरिअर्स, श्री तेली पुरस्कृत त्रिमूर्ती टायटन्स, प्रवीण पाटील पुरस्कृत प्रवीण पाटील सुपरकिंग्ज, आकाश वाली पुरस्कृत डब्ल्यूएसएम इंपल्स केकेआर, गोरख माळी पुरस्कृत एम अँड के, दीपक वाघुले आणि रवींद्र पाटील पुरस्कृत दिया लाईफस्टाईल डेव्हलपर्स या संघांचा समावेश होता.
स्पर्धेच्या अन्य सामन्यात खेळाडू किशोर लंबे, आदर्श माळी, अमित कतगर, राज निंगनुरे, शंकर चौगुले, विनायक स्वामी, नामदेव गुरव, ऋषिकेश माळी, विनायक शेटे, सौरभ माळी, युवराज पाटील, संदीप कोठावळे, ओंकार मजगे, गजानन गुरव हे सामनावीर ठरले. कोल्हापूर जिल्ह्यातील लिंगायत समाजातील तरुण मुलांनी एकत्र येऊन त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि इतर बांधवानी एकत्र येऊन दैनंदिन कामकाजातून विसावा आणि आनंद लुटावा म्हणून स्पर्धेचे नियोजन मंजुनाथ साव्यानावर, विजयकुमार पाटील, विजय पाटील, सागर कुरबेट्टी, विनायक वाले, मनोज कतगर, बिपीन बारवडे, सत्यम मूरदंडे यांनी केले होते. त्यांना सूर्यकांत पाटील-बुध्दीहाळकर, संदीप नष्टे यांचे मार्गदर्शन लाभले.