२१ ऑगस्टपासून कोल्हापुरात बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
schedule14 Aug 25 person by visibility 27 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ब्राह्मण सभा करवीर पुरस्कृत ॲडव्होकेट पी.आर. मुंडरगी स्मृती एच् टू ई महाराष्ट्र राज्य तेरा वर्षाखालील मुला मुलींच्या निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा 21 ते 23 ऑगस्ट होणार आहे. येथील ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम, बिनखांबी गणेश मंदिराजवळ ही स्पर्धा होत आहे. चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केल्या आहेत. ही स्पर्धा ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम ने ॲडव्होकेट पी.आर्.मुंडरगी यांच्या स्मृती प्रित्यर्थ ॲडव्होकेट अशोक मुंडरगी यांच्या सहकार्याने प्रायोजित केल्या आहेत. अशी माहिती संयोजकांनी दिली.
ब्राह्मण सभा करवीर मंगलधामचे अध्यक्ष डॉ. उदय कुलकर्णी, उपाध्यक्ष डॉक्टर दिपक आंबर्डेकर, कार्यवाह श्रीकांत लिमये, चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भरत चौगुले, सचिव फिडे इन्स्ट्रक्टर मनिष मारुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद झाली. जागतिक बुद्धिबळ संघटना अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने होत असलेल्या या स्पर्धा स्विस् लिग पद्धतीने क्लासिकल आंतरराष्ट्रीय बुद्धिबळाच्या नियमानुसार एकूण आठ फेऱ्यात होणार आहेत. या स्पर्धेतून दोन मुलांची व दोन मुलींची निवड तीन ते नऊ सप्टेंबर दरम्यान गोवा येथे होणाऱ्या अखिल भारतीय तेरा वर्षाखालील राष्ट्रीय निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात केली जाणार आहे. विजेत्यांना बक्षीसे आहेत.
दोन्ही गटातील विजेत्याला रोख चार हजार व चषक उपविजेत्याला रोख अडीच हजार रुपये व चषक तर तृतीय क्रमांकास रोख दोन हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त सात, नऊ व अकरा वर्षाखालील प्रत्येक गटात तीन असे एकूण १८ चषक उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून निवड झालेल्या बुद्धिबळपटूस एक हजार रुपये व निवड न झालेल्या बुद्धिबळपटूस दोन हजार रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येकाने महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रवेश फीसह नावनोंदणी करावयाची आहे. यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली. पत्रकार परिषदेला धीरज वैद्य,उत्कर्ष लोमटे, प्रितम घोडके,अनिश गांधी, प्रशांत पिसे उपस्थित होते.