सहाय्यक प्राध्यापक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत लवकरच प्रक्रिया-मंत्री चंद्रकांत पाटील
schedule14 Aug 25 person by visibility 153 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ राज्यात साडेपाच हजार सहाय्यक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरतीबाबत कार्यवाही सुरू आहे. लवकरच भरती प्रक्रिया सुरु होईल.’अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
एमफिलधारकांचा गेली 32 वर्ष प्रलंबित प्रश्न सोडविल्याबद्दल विद्यापीठ विकास मंच व शिवाजी विद्यापीठ एमफिल आघाडीतर्फे मंत्री पाटील यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. गुरुवारी (१४ ऑगस्ट २०२५) हॉटेल रेडिएंट येथे हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी विद्यापीठ विकास मंचचे प्रदेश अध्यक्ष प्रा. एन डी पाटील, प्राचर्य डी .आर .मोरे सर, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. रघुनाथ ढमकले, निमंत्रक ॲड.स्वागत परुळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा.ढमकले यांनी एमफिलधारकांचा प्रश्न आणि मंत्री पाटील यांच्या माध्यमातून झालेली सोडवणूक याबाबतची माहिती दिली. प्रा एन डी पाटी यांनी विद्यापीठ विकास मंच ही नेहमी एमफिल प्रश्नाबाबत प्राध्यापकांच्या सोबत राहिलेली आहे असे मत व्यक्त केले.
मंत्री पाटील म्हणाले ‘एमफिलधारकांचा गेले अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान व यूजीसी सेक्रेटरी मनीष जोशी यांच्यासोबत चर्चा केली. राज्य सरकार तसेच या उच्च शिक्षणखात्याचा मंत्री म्हणून मी नेहमी सकारात्मक भूमिका घेतली. एमफिलधारक प्राध्यापकाना सेवा कायम होतानाच वेतन व उच्च पद लाभही मिळणार आहे. भविष्यात देखील कोणत्याही स्वरूपाची अडचण एमफिलधारक प्राध्यापकांना येऊ देणार नाही. काही प्रलंबित प्रश्नाबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठपुरावा करतानाच राज्य शासन स्तरावरही या एमफिलधारक प्राध्यापकांना न्याय देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.’ या कार्यक्रमाला पुणे, सांगली, साताराव कोल्हापुरातील प्राध्यापक उपस्थित होते.