Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
केएमटी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर सुधारित वेतनश्रेणी ! नगरविकासचा आदेश !!तिरुपती बालाजी येथे महाराष्ट्र सदन स्थापन करा, राजेश क्षीरसागरांची मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणीबदली टप्पा क्रमांक सहामधील शिक्षकांना शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविण्याची सुविधा २१ ऑगस्टपासून कोल्हापुरात  बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजनसहाय्यक प्राध्यापक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत लवकरच प्रक्रिया-मंत्री चंद्रकांत पाटील न्यू वूमेन्स कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये नेत्ररोग तपासणी शिबिरकोल्हापुरात 19 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय वीज परिषद, वीज दरवाढीच्या विरोधात ठरणार आंदोलनाची दिशाकॉमर्स कॉलेजमध्ये डॉ. रंगनाथन यांची जयंती साजरीगोकुळ करणार आईस्क्रिम अन् चीज निर्मिती ! गडहिंग्लजला उभारणार म्हैस विक्री केंद्र !!शिक्षक संघ थोरात गटाची कोल्हापूर शहर कार्यकारिणीची घोषणा

जाहिरात

 

कोल्हापुरात 19 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय वीज परिषद, वीज दरवाढीच्या विरोधात ठरणार आंदोलनाची दिशा

schedule14 Aug 25 person by visibility 178 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : सरकारने वीज दरवाढ तत्काळ मागे घ्यावी या मागणीसाठी कोल्हापुरात 19 ऑगस्ट 2025 रोजी राज्यस्तरीय वीज परिषद भरवले जाणार आहे.  या वीज परिषदेमध्ये व्यापारी, उद्योजक, शेतकरी आणि घरगुती वीज ग्राहकांचा समावेश असणार आहे. हे सारे घटक एकत्र येऊन सरकारला वीज दरवाढीच्या विरोधात निर्णायक इशारा देणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. ही वीज परिषद गायन समाज देवल क्लब येतील गोविंदराव टेंबे रंगमंदिर येथे सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत होणार आहे
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रियल एग्रीकल्चर मुंबई व कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. महाराष्ट्र राज अधिवेशन फेडरेशन, द महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटना, अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि इतर औद्योगिक संघटनांचा यामध्ये सहभाग आहे. या वीज परिषदेत पुण्याचे विवेक वेलणकर, शंतनू दीक्षित, मिरजचे  शेखर करंदीकर, वीज ग्राहक संघटना इचलकरंजीचे जावेद मोमीन, उद्योजक सचिन शिरगावकर, वीज ग्राहक तक्रार निवारण मंचचे माजी अध्यक्ष अजय भोसरेकर. वीज ग्राहक तक्रार निवारण मंच कोल्हापूरचे माजी सदस्य कमलाकर बुरांडे, महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे नाशिकचे अमित कुलकर्णी, प्रदीप खाडे ,महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे कार्याध्यक्ष रत्नाकर तांबे, विक्रांत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. जानेवारी 2025 मध्ये महावितरणने वीज नियामक आयोगाकडे दर प्रस्ताव सादर केला. ग्राहकांनी या प्रस्तावाला ठाम विरोध केला. 28 मार्च रोजी आयोगाने स्थिती दिली होती. पण तीन एप्रिलला  स्थगिती मागे घेतली आणि 25 जूनला हरकती न  मागवता नवे दरपत्रक जाहीर केले. त्यामुळे वीज दरवाढीला साऱ्यांनी एकत्रितपणे विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. वीज दरवाढ विरोधाततील लढ्याची सुरुवात म्हणजे वीज परिषद आहे. राज्यभरातील व्यापारी, उद्योजक, घरगुती व शेती ग्राहक परिषदेसाठी कोल्हापुरात मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे गांधी यांनी सांगितले. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले,  महावितरणकडून बसवले जाणारे स्मार्ट मीटर सदोष आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटर सक्ती नसल्याचे सांगूनही महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. त्याला आमचा विरोध आहे. कारखानदार राजू पाटील म्हणाले, अन्य राज्यात उद्योग क्षेत्राकडून क्रॉस सबसिडी वसूल केली जात नाही. मात्र महाराष्ट्रात क्रॉस सबसिडी वसूल केली जाते. किती वर्षे अशी वसुली करत राहणार ? असा सवाल त्यांनी केला. इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील म्हणाले, महावितरण कडून शेतकऱ्यांच्या नावावर खोटी व थकित  बिले दाखवून सरकारकडून अनुदान घेतले जाते. शेतकऱ्यांच्या नावावर वीज चोरी दाखवले जाते हा सारा प्रकार चुकीचा आहे. वीज परिषदेमध्ये या साऱ्या प्रकारा विरोधात लढा देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. ललित गांधी म्हणाले वीज परिषदेमध्ये सगळ्या घटकांनी एकत्र येऊन वीजदरवाढीच्या विरोधात निर्णायक लढा पुकारला जाईल. सरकारला अहवाल सादर करण्यात येणार आहे. सरकारने वीज दरवाढ मागे घेतले नाही तर आंदोलन राज्य पातळीवर केले जाईल. पत्रकार परिषदेला चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक धनंजय दुगे, जयेश ओसवाल, वैभव सावर्डेकर, प्रशांत शिंदे, अजित कोठारी, राहुल नष्टे, अनिल  धडाम, हॉटेल मालक संघाचे  सिद्धार्थ लाटकर, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे प्रदीप व्हरांबळे आदी उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes