मुख्याध्यापक अर्जित रजा रोखीकरणावर लवकरच मार्ग काढू : शिक्षणमंत्री दादा भुसे
schedule25 Feb 26 person by visibility 46 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राज्यातील खाजगी प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकाच्या अर्जित रजा रोखीकरणाबाबत लवकरच मार्ग काढू असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे व शिक्षक सेनेचे संतोष आयरे यांना दिले .
मुख्याध्यापकांचे अर्जित रजा रोखीकरण , वेतनेतर अनुदान, मेडिकल बिलांची राज्य सरकारकडून शंभर टक्के प्रतिपूर्ती , टीईटी परीक्षा काठिण्य पातळीसह अनेक विषयावर निवेदन दिले. अर्जित रजा रोखीकरणाचा प्रस्ताव राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्याकडून मंत्रालयात आला आहे. खाजगी प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरणाचा लाभ द्यावा , अशी विनंती केली.
यावेळी मंत्रालयामधील उपसचिव आबासाहेब कवळे , अवर सचिव शरद माकणे , अवर सचिव विशाल लोहार , अवर सचिव संतोष परमार विकास सावंत , संतोष नेर्लेकर सत्यजीत जाधव या अधिकाऱ्यांची भेट घेऊन अर्जित रजा रोखीकरण , मेडिकल बिलांची प्रतिपूर्ती , शाळांचे वेतनेतर अनुदान , म भता लागू करणे , टीईटीच्या अटीच्या अधिन राहून पदोन्नती , डीसीपीएस / एनपीस खाती नसलेल्यांच्या फरकांच्या रक्कमा रोखीने अदा होणे व सेवानिवृतांना ग्रॅच्युईटी मिळणे , चौथी व सातवी शिष्यवृती परीक्षेच्या इंग्रजी विभागामध्ये मराठीतून सूचना देणे इत्यांदी मागण्यांबाबत निवेदने देऊन चर्चा केली. या मागण्या पूर्ण करण्याची आवश्यकता का आहे? याचे स्पष्टीकरण दिले.