Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
दूध संस्था कर्मचारी संघटनेमार्फत गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफांचा सत्कारशुक्रवारी लख लख चंदेरी कार्यक्रमईएसआय हॉस्पिटलमध्ये लवकरच शंभर बेडची सुविधापाचगावमध्ये डीवाय पाटील मेडिकल कॉलेजचे  श्रमसंस्कार शिबीर जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड 20 मार्चपूर्वी होणार नागरी सुविधांबाबत कोल्हापूर नेक्स्टच्या सदस्यांची महापौरसोबत चर्चा मुख्याध्यापक अर्जित रजा रोखीकरणावर  लवकरच मार्ग काढू : शिक्षणमंत्री दादा भुसेमहापालिकेत शारंगधर देशमुख - आदिल फरासांत हमरीतुमरी! !भोई समाजाचे मार्चमध्ये राष्ट्रीय अधिवेशनज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील हे मराठी साहित्याच्या पिकाचे राखणदार - राजन गवस

जाहिरात

 

पाचगावमध्ये डीवाय पाटील मेडिकल कॉलेजचे  श्रमसंस्कार शिबीर 

schedule25 Feb 26 person by visibility 28 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : विद्यार्थी दशेत मिळालेले श्रमसंस्कार हे आयुष्याची खरी शिदोरी असते. ‘नॉट मी बट यु’ या भावनेतून जेव्हा तरुण गावाच्या मातीत मिसळतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने ग्रामविकासाला गती मिळते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजलेली ही सामाजिक बांधिलकी भविष्यात  सुसंस्कृत समाज घडवेल व त्यातूनच समृध्द गावाचे स्वप्न साकार होईल असे प्रतिपादन पाचगावच्या सरपंच प्रियांका संग्राम पाटील यांनी केले.

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट आणि मेडिकल कॉलेजच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान पाचगाव येथे हे शिबिर झाले

.विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले म्हणाले,  विद्यापीठाचे सर्व विद्यार्थी समाजसेवेला आपले आद्य कर्तव्य मानतात. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक ऐक्य जपण्यासाठी हे तरुण राष्ट्रसेवक म्हणून सदैव तत्पर राहतील. 

मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा म्हणाले, ग्रामविकासासोबतच आरोग्य साक्षरता अत्यंत महत्त्वाची आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ग्रामीण भागात आरोग्यविषयक जागृती, स्वच्छतेबाबतच ग्रामस्थांचे प्रबोधन करून एक 'आरोग्यसंपन्न गाव' घडवण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाउल टाकले आहे. स्कूल ऑफ इंजिनीअरिंगचे संचालक डॉ. अजित पाटील यांनी या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा वृद्धिंगत होत असल्याचे नमूद केले.यावेळी उपसरपंच दिपाली प्रकाश गाडगीळ, केंद्र शाळा मुख्याध्यापक अशोक पाटील, विद्यामंदिर शांतीनगरच्या मुख्याध्यापिका मंगल देवठाणेकर, विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण विभाग संचालक डॉ. अद्वैत राठोड,  मेडिकल कॉलेज अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, डॉ. रेणुका तुरंबेकर, डॉ. पुरुषोत्तम पेटारे, डॉ. जगन्नाथ शेटे, उपस्थित होते. शिबिरासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील व कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. 

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes