दूध संस्था कर्मचारी संघटनेमार्फत गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफांचा सत्कार
schedule25 Feb 26 person by visibility 17 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्ये वाढ केल्याबद्दल गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक मंडळ यांचा गोकुळ दूध संघाशी संलग्न प्राथमिक दूध संस्था कर्मचारी संघटनेमार्फत संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ताराबाई पार्क येथील गोकुळच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला.
चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, उत्पादक हाच गोकुळचा खरा पाया आहे. दूध उत्पादकांची आर्थिक उन्नती साधणे हेच संघाचे मुख्य उद्दिष्ट आहे. करण्यात आलेली दरवाढ निश्चितच उत्पादकांच्या आर्थिक विकासाला चालना देणारी ठरेल. कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सत्काराबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. पुढे ते म्हणाले की, गोकुळ संलग्न प्राथमिक दूध संस्था आणि त्या संस्थांमध्ये कार्यरत कर्मचारी वर्ग यांचा संघाच्या प्रगतीत मोलाचा वाटा आहे.
यावेळी गोकुळचे संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, बाळासो खाडे, युवराज पाटील, संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील, शामराव पाटील, विश्वास पाटील, सुरेश जाधव, तानाजी गुरव, सरदार देसाई, संजय पानारी, मंगेश बेडकळ, रामचंद्र चौगले, शिवाजी शिंदे, सूनिल विभूते उपस्थित होते.