Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
दूध संस्था कर्मचारी संघटनेमार्फत गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफांचा सत्कारशुक्रवारी लख लख चंदेरी कार्यक्रमईएसआय हॉस्पिटलमध्ये लवकरच शंभर बेडची सुविधापाचगावमध्ये डीवाय पाटील मेडिकल कॉलेजचे  श्रमसंस्कार शिबीर जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड 20 मार्चपूर्वी होणार नागरी सुविधांबाबत कोल्हापूर नेक्स्टच्या सदस्यांची महापौरसोबत चर्चा मुख्याध्यापक अर्जित रजा रोखीकरणावर  लवकरच मार्ग काढू : शिक्षणमंत्री दादा भुसेमहापालिकेत शारंगधर देशमुख - आदिल फरासांत हमरीतुमरी! !भोई समाजाचे मार्चमध्ये राष्ट्रीय अधिवेशनज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील हे मराठी साहित्याच्या पिकाचे राखणदार - राजन गवस

जाहिरात

 

नागरी सुविधांबाबत कोल्हापूर नेक्स्टच्या सदस्यांची महापौरसोबत चर्चा

schedule25 Feb 26 person by visibility 29 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन : कोल्हापूर शहरातील नागरी सुविधांच्या समस्यांबाबत  कोल्हापूर नेक्स्ट सदस्यांनी  महापौर रूपाराणी निकम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. तसेच महापौरपदी निवड झाल्याबद्दल निकम यांचा सत्कार केला.

 निमंत्रक चंद्रकांत चव्हाण, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, प्रदीप उलपे, यशवंत माने, वंदना पुसाळकर, ओंकार गोसावी यांनी यापूर्वी महानगरपालिकेला दिलेल्या निवेदनांची माहिती महापौरांना करून दिली.
कमी कर्मचारी संख्या, शहर स्वच्छता, विस्कटलेली पाणीपुरवठा व्यवस्था, नगररचना विभागातील अधिकाऱ्यांचे बेकायदेशीर व न्यायालयीन आदेश धुडकावून चाललेले वागणे, अतिक्रमण विभागाचा अकार्यक्षम कारभार, इस्टेट विभागाकडील महानगरपालिकेचे गाळे व सभागृहे यातून थांबलेले उत्पन्न, घराफाळ्याचे अत्यंत संथ गतीने चाललेले पुनर्सर्वेक्षण या आणि अशा विविध विषयांवर सदस्यांनी मतप्रदर्शन केले. महापौर निकम यांनी या सर्व विषयासंबंधी  पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. यावेळी प्रसाद पाटोळे, अमित टिकले, डॉ. अनिकेत कुलकर्णी, शेफाली मेहता अनिल पोवार, मालती शिंदे आदि उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes