विवेकानंद कॉलेज हे गुणवत्तेचे मानदंड - प्राचार्य अभयकुमार साळुंखे
schedule07 May 25 person by visibility 136 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : ‘विवेकानंद कॉलेज हे गुणवत्तेचे मानदंड आहे. बारावी बोर्ड परीक्षेत गेली तीन तपे विज्ञान, वाणिज्य व कलाशाखेत सर्वप्रथम येण्याचा बहुमान विवेकानंद कॉलेजने कायम टिकवला आहे.’असे गौरवोद्गगार श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी काढले.
विवेकानंद कॉलेजमध्ये बारावी बोर्ड परीक्षेतील यशवंतांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य साळुंखे बोलत होते. याप्रसंगी बोलताना कार्याध्यक्ष साळुंखे यांनी, ‘गुणवंत विद्यार्थ्यांनी बुद्धिमत्तेच्या जोरावर सर्वोच्च स्थानी जाऊन आपल्यातील सुसंस्काराने सामर्थ्यशाली देश घडवावा.’ असे आवाहन केले. कॉलेजचे प्राचार्य आर. आर. कुंभार म्हणाले, ‘महाराष्ट्रातील अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालयात विवेकानंद महाविद्यालय हे सर्वोत्तम कामगिरी करत आहे. विवेकानंद कॉलेजव्या प्रांगणात सर्व प्रकारची ज्ञान क्षेत्रे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहेत.’ गुणवंत विद्यार्थी विज्ञान शाखेवा प्रथम मानकरी डालमेट कित फ्रान्सिस, माधुरी जाधव, साक्षी शर्मा, श्रुती मगदूम, वाणिज्य शाखेचे रेहान कित्तूर, नंदना कुलकर्णी, स्वरा दामुगडे, कला शाखेतील सर्वप्रथम आलेला करण पाटील, गौरी मते, इंद्रजीत साळोखे तसेच जेईई परीक्षेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात संस्थेच्या प्रार्थनेने झाला. विभागप्रमुख प्रा ३प्रा. शिल्पा भोसले यांनी प्रास्ताविक केले. प्रा.सौ. एस. पी. वेदांते यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एस. टी. शिंदे यांनी आभार मानले.