पणदूरकर दाम्पत्याच्या दातृत्वाची, पुनर्पर्चिती ! भारतीय संरक्षण निधीसाठी पाच लाखाची देणगी !!
schedule07 May 25 person by visibility 237 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील, हेम किरण रामचंद्र पणदूरकर यांनी, पहलगाम भ्याड अतिरेकी हल्ल्यानंतर, निर्माण झालेल्या परिस्थितीत, भारतीय लष्कराचे मनोधैर्य व वित्तीय वाढ करून देण्यासाठी, "भारतीय राष्ट्रीय संरक्षण निधी, म्हणजेच नॅशनल डिफेन्स फंड" यासाठी रुपये पाच लाख एवढी देणगी दिली.
पंतप्रधान कार्यालय, दिल्ली येथे रवाना करण्यासाठी, डॉ. राम पणदूरकर यांच्याकडे धनादेश हस्तांतरित केला. हा धनादेश पंतप्रधान कार्यालय दिल्ली या ठिकाणी रवाना झालेला आहे या निधीसाठी दिलेली रक्कम, अंडर सेक्रेटरी ( फंड्स ) पीएमओ, साऊथ ब्लॉक, नवी दिल्ली अकरा येथे पाठविली. यापूर्वी पणदूरकर यांनी, शिवाजी विद्यापीठात कमवा व शिका योजनेअंतर्गत, गरीब मुलींच्या अभ्यासिकेची सोय करण्यासाठी रुपये साठ लाख रुपयांची देणगी दिली होती. त्या देणगीतून त्यांची दिवंगत कन्या रूपाली पणदूरकर या नावांनी अभ्यासिका बांधण्यात आली आहे. अभ्यासिका, दुमजली आहे. ३०० विद्यार्थीनीं, एकावेळेस अभ्यास करू शकतील, अशा प्रकारची सोय व ग्रंथालयही सुसज्ज आहे.
सैनिकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी रुपये पाच लाख देणगी, कै. विधिज्ञ, डॉक्टर, रूपाली पणदूरकर स्मृती प्रित्यर्थ दिली आहे. यापूर्वीही पणदूरकर दांपत्याने अनेक सामाजिक संस्थांना कन्येच्या स्मृती प्रित्यर्थ देणग्या दिल्या आहेत. शिवाय लहान मुलींसाठीही पोस्टातील सुकन्या समृद्धी योजनेतही खाते उघडून काही लहान मुलींसाठी दरवर्षी ठराविक पैसे भरतात. शिवाजी विद्यापीठाचे माजी भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. राम पणदुरकर व त्यांच्या पत्नी हेमकिरण पणदूरकर यांचे समाजातून कौतुक होत आहे.